Solapur DCC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur DCC Bank : जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांकडील वसुली थांबवली

Co-Operative Bank : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्या तत्कालीन संचालक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ३५ जणांवर ठपका ठेवत चौकशी समितीने त्यांच्याकडून २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपयांची वसुली निश्‍चिती केली.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्या तत्कालीन संचालक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ३५ जणांवर ठपका ठेवत चौकशी समितीने त्यांच्याकडून २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपयांची वसुली निश्‍चिती केली. पण या प्रकरणी निर्णय होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला, पण पुढील कोणतीच प्रक्रिया सुरू नसून, कामकाज मात्र ठप्प झाले आहे.

जिल्हा बँकेच्या या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी चौकशी केली आहे. त्यांचा अहवाल त्यांनी ८ नोव्हेंबरला विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्याकडे दिला आहे. त्यात तत्कालीन संचालकांसह काही अधिकारी-कर्मचाऱ्यासह स्पष्टपणे ३५ जणांवर ठपका ठेवला आहे.

तसेच त्यांच्याकडून २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपयांची वसुली काढली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, सिद्रामप्पा पाटील, जयवंतराव जगताप आदी दिग्गज नेत्यांचा त्यात समावेश आहे.

आता या वसुलीसाठी खास वसुली अधिकारयांची नियुक्ती होणार आहे. पण त्यासाठी आवश्यक असणारे वसुलीचे दाखले काढण्याची प्रक्रिया आहे. पण आज २० दिवसांनंतरही याबाबतची कोणतीच प्रक्रिया सुरू झालेली नाही. विधानसभा निवडणुकीमुळे ही प्रक्रिया थांबली असल्याचे सांगितले जाते. पण त्यानंतरही याबाबत कारवाईसाठी अद्याप काहीच हालचाली नाहीत.

सहकारमंत्र्यांकडे अपिलाची संधी

या प्रकरणातील ठपका असणारे संचालक आणि अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी दिलेला आहे. तसेच नव्या मंत्रिमंडळातील सहकारमंत्र्यांकडे या संचालक आणि अधिकाऱ्यांना यासंबंधी अपील करण्याची संधी आहे, पण कोणाकडे हे मंत्रिपद जाणार आणि पुढे ते काय निर्णय घेणार, हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT