Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Rainfall : सोलापूरकरांनी मे महिन्यात अनुभवला ऊन, पावसाचा अनोखा विक्रम

May Rainfall Maharashtra : यंदाचा मे महिना ऊन आणि पावसाच्या अनुभवांनी व वातावरणाच्या विक्रमांनी अनेक वर्षे कायम स्मरणात राहील.

Team Agrowon

Solapur News : सोलापूरकरांसाठी यंदाचा मे महिना ऊन व पावसाच्या अनोख्या अनुभवाचा अन् विक्रम नोंदवणारा गेला. ज्या मे महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

त्याच मे महिन्यातील पावसाने एका महिन्यातील सर्वाधिक १४१.२ मिलिमीटर पावसाचा १३२ वर्षांचा विक्रम यंदा मोडीत काढला. यंदाच्या मेमध्ये जिल्ह्यात २३३ मिलिमीटर पावसाची नोंद आणि नवा विक्रम झाला. यंदाचा मे महिना ऊन आणि पावसाच्या अनुभवांनी व वातावरणाच्या विक्रमांनी अनेक वर्षे कायम स्मरणात राहील.

मी तुमच्या पेक्षा जास्त उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेत, असे आवर्जून सांगणाऱ्यांसाठी यंदाच्या मे महिन्यातील उन्हाळा आणि पावसाळा अविस्मरणीय राहिला आहे. यंदाच्या मे महिन्याची सुरुवात कडक उन्हाने झाली होती. सोलापुरात १ मे रोजी ४४.१ तर २ मे रोजी ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

त्याच मे महिन्यात २५ मे रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात कमी २८.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाचीही नोंद झाली आहे. मे महिन्यात दरवर्षी पाण्यासाठी भटकणाऱ्या सोलापूरकरांना यंदाच्या पावसाने जोरदार धुतले. यंदाच्या उन्हाळ्यात पावसाळा घेऊन आलेला मे महिना सोलापूरकरांसाठी अविस्मरणीय झाला आहे.

मे महिन्यातील नुकसान

बाधित गावे : ३४१

वीज पडून मृत्यू : २

लहान-मोठ्या जनावारांचा मृत्यू : ५७

घरांची अंशत: पडझड : १४०

बाधित शेती : १९७९.७७ हेक्टर

बाधित शेतकरी : ३ हजार ६१९

मे महिन्यातील तापमानाबद्दल

सर्वाधिक कमाल तापमान : ४४.७ (२ मे)

सर्वात कमी कमाल तापमान : २८.३ (२५ मे)

मे मधील सर्वाधिक तापमानाचा विक्रम : ४६ अंश सेल्सिअस (१० मे १९८८)

मेमधील तालुकानिहाय पाऊस व पावसाचे दिवस

माळशिरस २८६.३ (१२)

उत्तर सोलापूर २७९.९ (१६)

करमाळा २७१.८ (१२)

माढा २६६.१ (१२)

बार्शी २५५.० (१३)

दक्षिण सोलापूर २२१.७ (१५)

सांगोला २१९.४ (१४)

मोहोळ २१३.१ (१०)

अक्कलको २०९.९ (१४)

मंगळवेढा १८५.९ (१२)

पंढरपूर १५७.० (९)

एकूण २३३.० (१७)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Supply: खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा, एप्रिलमध्ये देशांतर्गत युरिया उत्पादनात ११ टक्के वाढीची शक्यता

Onion Storage Disease Control: कांदा साठवणुकीतील काजळी, निळी-हिरवी बुरशीचे नियंत्रण

Government Officer Case: अकोल्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

Fogging System: शेडनेट हाउसमधील फॉगिंग प्रणाली

PM Kusum Scheme: सौर पंपाच्या गोंधळाला लागणार ब्रेक; शिबिराचे आयोजन

SCROLL FOR NEXT