Solapur Agriculture News agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Agriculture News : ‘कृषी पर्यवेक्षक’चे अधीक्षक कृषी अधिकऱ्यांना निवेदन

Solapur Agriculture Officers Agitation : राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेनेही आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे.

Team Agrowon

Solapur Agriculture : राज्यातील कृषी सहायक संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केल्यानंतर आता राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेनेही आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे. सोलापुरातही सोमवारी (ता. १९) राज्याध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांना निवेदन दिले.

संघटनेचे राज्याध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात हे निवेदन देण्यात आले. आंदोलनासंबंधी दिलेल्या या निवेदनानंतर २० ते २२ मे दरम्यान कृषी पर्यवेक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. २३ ला कृषी विभागाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून सर्व कृषी पर्यवेक्षक बाहेर पडतील.

२६ ला कृषी विभागाच्या सर्व योजना आणि उपक्रमावर बहिष्कार टाकला जाईल. ३० ला सामूहिक रजा आंदोलन आणि दोन जूननंतर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

कृषी पर्यवेक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, कृषी पर्यवेक्षकांना कृषी अधिकारीपदी पदोन्नती देण्याबाबत होत असलेली चालढकल, मोका तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या डाटा चार्जेसचा खर्च मिळावा, मृदा व जलसंधारणाचे काम पूर्वीप्रमाणेच कृषी विभागाकडे ठेवावेत, यांच्या मागण्या आहेत असेही पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Pesticide: बनावट कीडनाशकांची उलाढाल ११ हजार कोटींवर

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढतोय

Maharashtra Drought Declaration: नव्याने १९ तालुके दुष्काळी

Agriculture PG Admission: पदव्युत्तर प्रवेशावरील तक्रारींवर कृषी परिषदेचा खुलासा

Sugar Hoarding Restrictions: साखरेच्या साठ्यावर केंद्राची मर्यादा

SCROLL FOR NEXT