Soil Testing Agrowon
ॲग्रो विशेष

Soil-Water Testing : कृषी विज्ञान केंद्रातर्फे माती-पाणी परीक्षणासाठी जनजागृती अभियान

Soil Health : कृषी विज्ञान केंद्र सोलापूरतर्फे घोळसगाव (ता. अक्कलकोट) येथे माती, पाणी परीक्षणाबाबत जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Solapur News : कृषी विज्ञान केंद्र सोलापूरतर्फे घोळसगाव (ता. अक्कलकोट) येथे माती, पाणी परीक्षणाबाबत जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना माती-पाणी परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे होते. या वेळी ज्येष्ठ नागरिक शांतप्पा बादोले, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी, अमोल शास्त्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रोहित लंगोटे इत्यादी उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांमध्ये माती व पाणी परीक्षणाविषयी अधिक जनजागृती होण्यासाठी या अभियानाचे आयोजन केले आहे, येत्या ३० एप्रिल हे अभियान चालणार आहे. या वेळी बोलताना डॉ. तांबडे यांनी पिकांना खतमात्रा देण्यासाठी माती परीक्षण केलेले असणे गरजेचे आहे.

त्यामुळे होणाऱ्या खर्चात बचत होते, आवश्यक तेवढीच रासायनिक खतांची मात्रा वापरली जाते, असे सांगितले. तसेच माती-पाणी परीक्षणाच्या दरामध्ये निम्म्याने यंदा कपात केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला विषय विशेषज्ञ श्री. गोजारी यांनी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेऊन या अभियानाद्वारे सभासद शेतकऱ्यांना माती, पाणी परीक्षणासाठी प्रवृत्त करावे, असे सांगितले. विषय विशेषज्ञ श्री. शास्त्री यांनी माती परीक्षणाद्वारे जमिनीतील अन्नद्रव्यांच्या पातळीचा अंदाज येतो व त्यानुसार खतमात्रा, विद्राव्य खते देण्यास सुलभ होते, असे सांगितले. या वेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आली.

माती-पाणी परीक्षणाबाबत प्रात्यक्षिक

कार्यक्रमाच्या तांत्रिकसत्रानंतर प्रात्यक्षिकामध्ये बसवराज पाटील यांचे शेतावर मातीचा नमुना कसा घ्यावा, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच मातीचा नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या ठिकाणचा नमुना घेऊ नये, नमुना देताना कोणती माहिती द्यावी, उभ्या पिकात नमुना कसा घ्यावा, पाण्याचा नमुना कसा घ्यावा, इत्यादी विषयी विस्तृत माहिती प्रात्यक्षिकावेळी शास्त्रज्ञांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT