Soil Testing : नागपूर विभागात ९४ हजार माती नमुन्यांचे परीक्षण

Soil Sample : मागील वर्षभराचा विचार केल्यास नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेसह विविध योजनेअंतर्गत आणि वैयक्तीक शेतकऱ्यांच्या ९४ हजार १२ जमिनीचे नमुने तपासण्यात आले.
Soil Test
Soil Test Agrowon
Published on
Updated on

Soil Health Card : नागपूर ः मागील वर्षभराचा विचार केल्यास नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेसह विविध योजनेअंतर्गत आणि वैयक्तीक शेतकऱ्यांच्या ९४ हजार १२ जमिनीचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ८७ हजार ३३८ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जमिनीचे अनेक प्रकार असतात. पण, संबंधित जमीन कोणत्या पिकांसाठी अधिक उपयुक्त आहे हे पाहणे महत्त्वाचे असते. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेमुळे मातीतील आम्लविम्ल निर्देशांक, क्षार, सेंद्रिय कर्ब, पालाश, नत्र, तांबे, लोह, जस्त, गंधक आदी घटकांचे प्रमाण स्पष्ट होते. नागपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांचे ४१८८ जमिनीचे नमुने तपासून आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आली.

तर २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेसह विविध योजनेअंतर्गत एकूण ९४ हजार १२ मृद नमुने तपासणी करून ८७ हजार ३३८ जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्यात. उर्वरित माती नमुन्यांच्या आरोग्य पत्रिका वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली.

Soil Test
Soil Test : संत्राबागेपूर्वी माती परीक्षण गरजेचे

कुठे व किती दिवसांत होते माती परीक्षण

माती परीक्षणामुळे रासायनिक खतांवर होणारा अनावश्यक खर्च कमी होण्यास मदत होते. परिणामी उत्पादन खर्च कमी होतो. केंद्र व राज्याच्या विविध योजनाअंतर्गंत तसेच शेतकऱ्यांनी आणलेल्या वैयक्तीक माती नमुन्यांची तपासणी विभागातील सहाही जिल्ह्यांतील जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयाच्या प्रयोगशाळेत केली जाते. वैयक्तीक नमुने महिन्याभराच्या आत तर योजनेतील एक-दीड महिन्यात तपासून आरोग्य पत्रिका दिल्या जाते.

...कसा घ्यावा माती नमुना

मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. गुरे बसण्याची, झाडाखालील जागा, खते आणि कचरा टाकण्याची जागा, दलदल तसेच घराजवळील जागा, पाण्याच्या पाटाखालील जागा येथील मातीचे नमुने घेऊ नयेत, असा तज्ञांचा सल्ला आहे.

आपण ज्या जमिनतून पिके घेतो त्या जमिनीचा प्रकार कोणता आहे. त्या मातीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत याची माहिती घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी वर्षातून एकदातरी माती परीक्षण करावे. माती परीक्षणाद्वारे पिकांना द्यावयाची खताची मात्रा ठरविणे शक्य होत असते.

- दीक्षिता तिरमारे, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी नागपूर

जिल्हानिहाय करण्यात आलेले मातीपरीक्षण

जिल्हा लक्षांक प्राप्त नमुने तपासलेले आरोग्य पत्रिका वाटप झालेले

वर्धा १४५०० १२७३० १२६७१ ९३३७

नागपूर १५४९८ १५४९८ १५४९८ १५४९८

भंडारा १३५०० १३२४८ १३२४८ १३२४८

गोंदिया १०८७४ १०८७४ १०८७४ १०८७४

चंद्रपूर २१५०० २१४७७ २१४७७ २१४७७

गडचिरोली १८००० १५९९७ १५९९७ १२७१६

एकूण ९३८७२ ८९८२४ ८९७६५ ८३१५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com