
Sangli News : जिल्ह्यात विविध योजनेतून सन २०२४-२५ या वर्षात २२ हजार ८०६ मातीचे नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय कर्ब आणि नत्र या घटकांचे प्रमाण कमी असल्याचे माती तपासणीतून समोर आले आहे. त्यानुसार माती परीक्षणाचा अहवालात कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे याच्या शिफारशीही शेतकऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मृद सर्वेक्षण मृत चाचणी विभागाने सांगितले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस, फळबाग, भाजीपाला याचे उत्पादन घेतले जाते. जमिनीची भूक न ओळखता शेतकऱ्यांकडून केवळ पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो आहे. परिणामी जमिनीचे आरोग्य धोक्यात येऊन शेती आणि शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हा मृदा चाचणी विभाग माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांत जागृती करत आहे.
राष्ट्रीय कृषी विकास, राष्ट्रीय अन्नसुरक्षा खरीप हंगाम,रब्बी हंगाम, मूल्यसाखळी योजना, भात सुधार प्रकल्प आणि सेंद्रिय शेती योजना याद्वारे माती परीक्षण केले जाते. जिल्ह्यात सन २०२४-२५ या वर्षात १७ हजार ७८९ नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट होते. २२ हजार ८०६ नमुन्यांचे माती परीक्षण केले आहे. ११ हजार ४६७ आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना पिकांच्या खतांच्या शिफारशीसह आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आले आहेत.
जिल्हा मृदा चाचणी विभागात सर्वसाधारण माती नमुना यामध्ये सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पाशाल तर सूक्ष्म मूलद्रव्य नमुना तपासणीमध्ये तांबे, लोह, मॅगेनीज, झिंक आणि पिकासाठी पाणी नमुना तपासणीमध्ये सामू, विद्युत वाहकता, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडियम, क्लोरिन, कार्बनिट, कायकार्बनिट, सल्फेट, एकूण विद्राव्य क्षार सोडियमचे इतर कटायनाचे प्रमाण तपासले जाते. माती परीक्षणामधून सेंद्रिय कर्ब आणि नत्र या घटकाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. तसेच शिराळा तालुका वगळता इतर तालुक्यात सामू वाढला असल्याचे माती परीक्षणातून समोर आले आहे.
माती तपासणी
योजना तपासलेलेनमुने संख्या
राष्ट्रीय कृषी विकास योजना ९२००
खरीप हंगाम कडधान्य पिके ५००
खरीप हंगाम भरड धान्य पिके ५५०
खरीप हंगाम पौष्टिक तृणधान्ये ३८००
खरीप हंगाम राष्ट्रीय खाद्यतेल १०३०
सोयाबीन व इतर तेलबिया १८००
रब्बी हंगाम कडधान्ये पिके ३१०
रब्बी हंगाम भातपीक कडध्याने ८०
पौष्टिक तृणधान्ये ३९९०
ऊसविकास पिके ४५०
सेंद्रिय शेती अभियान ७७९
वैयक्तिक शेतकरी ३१७
एकूण २२८०६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.