Orchard Plantation  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Variety : निवड फळझाडांच्या जातींची

Orchard Plantation : फळबाग हे बहुवर्षीय पीक असल्याने माती परीक्षण करूनच फळझाडाची लागवड करावी. जमिनीची योग्य निवड केली नाही तर कालांतराने फळ झाडांना बहर न येणे, वाढ खुंटणे, झाडे अकाली वाळणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. चांगल्या उत्पादनासाठी योग्य जातींची निवड महत्त्वाची ठरते.

Team Agrowon

भूषण यादगीरवार, डॉ. महेश बाबर

आपल्या भागातील जमीन, हवामानाचा विचार करून फळझाडांची लागवड न केल्यास फळे न येणे, फळे लागल्यास प्रत खालावणे, उशिरा फळे लागणे, रोग व किडींचा प्रादुर्भाव इत्यादी समस्या भेडसावतात. आपल्या जमिनीत शास्त्रोक्त पद्धतीने फळझाडे लागवड केल्यास निश्‍चित फायदा होतो. लागवडीचे नियोजन करण्यापूर्वी जमिनीची निवड, मातीची तपासणी, फळ पिकाची निवड, लागवडीचा आराखडा, जातिवंत कलमे, रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या सर्व गोष्टींचा विचार करावा.

फळबाग हे बहुवर्षीय पीक असल्याने माती परीक्षण करूनच फळझाडाची लागवड करावी. जमिनीची योग्य निवड केली नाही, तर कालांतराने फळ झाडांना बहर न येणे, झाडांची वाढ खुंटणे, झाडे अकाली वाळणे अशा अनेक समस्या निर्माण होतात.

फळझाडांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे जमिनीत दीड मीटर किंवा अगोदरच मुरूम लागल्यास, मुरमापर्यंत खोल खड्डा करून मातीचा नमुने घ्यावे. याकरिता जमिनीच्या गुणधर्मानुसार किंवा प्रकारानुसार प्रत्येक विभागात एक या प्रमाणे दीड मीटर किंवा मुरूम लागेपर्यंत खोल खड्डा करावा. खड्ड्याच्या उभ्या छेदाचे ३०, ६०, ९० सेंमी असे भाग पाडावेत.

काही जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक असते, काही क्षारांचे प्रमाण अधिक असते किंवा अतिशय कठीण थर असतो. यामुळे मुळांना नीट वाढता येत नाही. जर चुनखडी जास्त असेल तर माती चिकट असते. मुळांना त्यात वाढता येत नाही. हवेचे प्रमाण कमी असल्याने मुळे गुदमरतात. त्यांचा केसांच्या पुंजक्यासारख्या गुंता होतो. जास्त ओलसरपणामुळे ती कुजतात, त्यामुळे ती वाऱ्याने कोलमडतात. पांढरी मुळे कमी तयार होतात, त्यामुळे अन्नद्रव्यांचे पुरेशा प्रमाणात शोषण होत नाही. झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर लिंबूवर्गीय पिकांना ताण बसत नाही. बहर धरणे शक्य होत नाही.

त्यामुळे फळबाग लागवडीआधी रासायनिक व भौतिक गुणधर्म तपासणे आवश्यक आहे. जेणेकरून श्रम, वेळ आणि पैसे वाया जाणार नाही.

कृषी विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिकेमधून रोपे, कलमांची खरेदी करावी. शक्य नसल्यास आपल्या माहितीतील शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतून कलमे/रोपे घ्यावीत. कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत, यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत की नाहीत या बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. रोपे घेताना कलम बांधलेली आहेत आणि जोड पूर्णपणे जुळलेले आहेत याची खात्री करून घ्यावी.

चिंच

अवर्षणप्रवण किंवा कोरडवाहू विभागामध्ये चिंच लागवड करावी. उत्पादकता वाढविण्यासाठी कलम केलेल्या सुधारित जातींची निवड करावी. प्रतिष्ठान, स्मृती, पीकेएम- १, फुले श्रावणी या जातींना कमी कालावधीत फळे येतात.

सुधारित जाती

प्रतिष्ठान

फळांची सरासरी लांबी ७.५ सेंमी आणि आकार सरळ असतो.

गराचा रंग पिवळसर तांबडा, एक किलो कच्च्या चिंचेपासून ६०० ग्रॅम गर मिळतो. गरात आम्लता ९.२१ टक्के असते.

फुले श्रावणी

फळांचा आकर्षक तपकिरी रंग, किंचित वक्र, चवीला मध्यम गोड, गराचे प्रमाण अधिक असते.

पेरू

पारंपरिक लागवड पद्धतीच्या तुलनेमध्ये छाटणी तंत्राचा अवलंब करून सघन लागवड केल्यास अधिक फायदा मिळू शकतो.

फुले अमृत

मध्यम आकाराची फळे, लाल रंगाचा गर, फळाची साल चमकदार व गुळगुळीत, बियांचा कठीणपणा मध्यम मऊ, एकूण घन पदार्थ ११.७६ ब्रिक्स असतात.

सीताफळ

मे महिन्यात ५×५ मीटर अंतरावर योग्य आकाराचे खड्डे करावेत. पावसाळ्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, पोयटा मातीसह खड्डे भरावेत. खड्डे भरल्यानंतर रोपांची लागवड (जुलै-ऑगस्ट) पावसाळ्यात करावी. लागवडीसाठी बाळानगर, फुले पुरंदर यासारख्या जातींची निवड करावी.

सुधारित जाती

फुले जानकी

जातीची फळे आकर्षक आणि आकाराने मोठी. गराचे प्रमाण ५८.९६ टक्के.

गराचा रंग दुधाळ पांढरा व गर मऊ असतो, फळामध्ये बियांचे प्रमाण कमी असते.

फुले पुरंदर

फळांचा आकार मोठा, फळांतील बियांची संख्या कमी, गरामध्ये पांढऱ्या शुभ्र पाकळ्यांची संख्या अधिक, गर घट्ट, रवाड, फळात गराचे प्रमाण ४७.८२ टक्के.

डॉ. महेश बाबर ९८५०६८७२५३

(कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT