Gold Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Gold Rate Today : जळगावात सोने दरात किंचित घट

Team Agrowon

Jalgaon News : सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह ६२ हजार ८१९ रुपये प्रतितोळा (१० ग्रॅम) असे आहेत. सोने दरात मागील महिन्याच्या मध्यात वाढ झाली. ही वाढ टिकून आहे.

सप्टेंबरमध्ये सोन्याचे दर ५९ ते ६० हजार रुपये प्रतितोळा होते. परंतु आखाती देशांमधील तणाव, युद्धाची स्थिती व सणासुदीमुळे वाढलेली मागणी यामुळे सोने दरात वाढ झाली.

मध्यंतरी सोने दर जळगाव येथील सराफा बाजारात ६३ हजार रुपये प्रतितोळा, असे होते. परंतु त्यात मागील तीन-चार दिवसांत किंचित घट झाली.

सणासुदीमुळे सोन्याची मागणी कायम आहे. दसऱ्यानंतर आता दिवाळीनिमित्त सोन्याची मागणी आहे. जळगावच्या सराफा बाजारात विविध प्रकार व आकारांच्या आकर्षक दागिन्यांची मालिका काही आस्थापनांवर सादर करण्यात आली आहे.

परंतु ग्रामीण भागात खरेदीसाठी ग्राहकांमध्ये चैतन्य, उत्साह कमी आहे. यामुळे सोन्याची मागणी ग्रामीण भागात कमी आहे. सराफा बाजारात रविवारी (ता. ५) २२ कॅरेट सोन्याचे दर ५७ हजार ५८४ रुपये प्रतितोळा असे जाहीर झाले.

सोने दर ६३ हजार रुपये प्रतितोळापर्यंत पोहोचले होते. ऑक्टोबरच्या मध्यात झालेली दरवाढ टिकून होती, परंतु मागील तीन ते चार दिवसांत दरवाढीला किंचित ब्रेक लागला आहे. सोन्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात सहा टक्के कमी झाली आहे. यामुळे दरवाढ तूर्त थांबल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चांदी दरात वाढ

चांदी दरात या महिन्यात किंवा मागील २० ते २२ दिवसांत पुन्हा वाढ झाली आहे. दर प्रतिकिलो ७८ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सप्टेंबरमध्ये चांदीचे दर ७२ हजार रुपये प्रतिकिलो होते. ऑक्टोबरमध्येही दर वाढले व ते ७४ हजार रुपये प्रतिकिलो असे होते. त्यात ऑक्टोबरमध्ये वाढ होतच राहिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT