Ratanagiri Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg, Ratanagiri Rain : सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या सरी सुरूच

Monsoon Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पावसाच्या हलक्या, मध्यम सरी सुरूच आहेत. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.

Team Agrowon

Sindhudurg Rain News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पावसाच्या हलक्या, मध्यम सरी सुरूच आहेत. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. दरम्यान जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ९६.१ मिमी पाऊस झाला.

जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोरडे असलेले नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

दरम्यान गुरुवारी (ता. २९) दिवसभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. या पावसामुळे भातरोप पुनर्लागवडीच्या कामांना वेग आला आहे. भातरोप काढणी वेगात सुरू आहे. गरव्या बियाण्यांची पुनर्लागवड सध्या सुरू आहे. याशिवाय पाणथळ जमिनीतील लागवड सध्या शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

गुरुवारी दिवसभर बरसल्यानंतर शुक्रवारी (ता. ३०) पहाटेपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या तर काही भागांत मध्यम सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. पुनर्लागवडीची पूर्वतयारीदेखील केली जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच

रत्नागिरीत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाचा फटका घाटातील रस्त्यांना बसला आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर नाणीज येथे मध्यरात्री रस्ता खचल्यामुळे सुमारे बारा तास वाहतूक ठप्प झाली होती.

गुरुवारी (ता. २९) रात्रीपासून वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंत सुरूच होता. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील नाणीज शाळेजवळ काही भाग खचल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

चिखलामुळे ट्रकसह काही वाहने मातीत रुतली. कोल्हापूर आणि रत्नागिरीकडे जाणाऱ्या वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छोटी वाहने चोरवणे मार्गे सोडली. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक लांजा-दाभोळ मार्गे वळविण्यात आली.

रस्ता दुरुस्तीनंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. खेड तालुक्यात किल्ले रसाळगडच्या पायथ्याशी दरड कोसळली. रत्नागिरीत पावसाचा जोर आहे. खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

सरासरी ४२९ मिमी पावसाची नोंद

१ जूनपासून आतापर्यंत ४२९ मिमी सरासरी नोंद झाली असून गतवर्षीच्या तुलनेत २०० मिमी कमी पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ८.३० पर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात ७४ मिमी सरासरी पाऊस झाला. त्यात मंडणगडमध्ये ९० मिमी, दापोली १२१, खेड ६२, गुहागर ४२, चिपळूण १०९, संगेमश्‍वर ६१, रत्नागिरी ३२, लांजा ५९, राजापुरात ९० मिमी पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Traditional Fisherman : पांरपरिक मच्छीमारांची मालवण येथील कार्यालयावर धडक

Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

SCROLL FOR NEXT