Sericulture Farmer  Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : तीन रेशीम कोष उत्पादक दांपत्यांचा केला गौरव

Silk Farming : पैठण तालुक्यातील देवगाव येथील रेशीम मंडळाने रामनवमीच्या मुहूर्तावर गावातील सर्वोत्कृष्ट तीन रेशीम कोष उत्पादक दांपत्याच्या सत्काराची परंपरा सुरू केली आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : पैठण तालुक्यातील देवगाव येथील रेशीम मंडळाने रामनवमीच्या मुहूर्तावर गावातील सर्वोत्कृष्ट तीन रेशीम कोष उत्पादक दांपत्याच्या सत्काराची परंपरा सुरू केली आहे. त्यानिमित्ताने रविवारी (ता. ६) पहिल्यांदा तीन रेशीम कोष उत्पादक दांपत्यांचा गौरव करण्यात आला.

पैठण तालुक्यातील देवगाव मराठवाड्यातील रेशीम कोष उत्पादनातील अग्रेसर गाव म्हणून पुढे आले आहे. या गावातील सुमारे ७० पेक्षा जास्त शेतकरी रेशीम कोष उत्पादनात उतरले आहेत. गावातीलच रेशीम कोष उत्पादक शहादेव ढाकणे व सदाशिव गिते या दोघांना रेशीम रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

यापैकी रेशीमरत्न शहादेव ढाकणे यांना आपण आपल्या गावातील रेशीम कोष उत्पादकांना प्रोत्साहन द्यायला हवे हा विचार मनात आला. त्यांनी तो त्यांच्या रेशीम मंडळासमोर मांडला. लागलीच त्याला मूर्त रूप येऊन रेशीम रत्न वगळता गावातील इतर रेशीम कोष उत्पादकांमधून कुणी सर्वाधिक उत्पन्न घेतले त्याची निवड करण्यात आली. त्यांचा सत्काराचा मुहूर्त रामनवमीच्या दिवशी ठरविण्यात आला.

या सत्कार सोहळ्यासाठी ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संतोष शाळीग्राम यांची प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगावचे सरपंच योगेश कोठुळे तर प्रमुख अतिथी म्हणून जालन्यातील चोकी सेंटर चालक विजय पाटील यांच्यासह उपसरपंच भास्कर गीते, ‘ॲग्रोवन’चे वरिष्ठ बातमीदार संतोष मुंढे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवगावच्या शेतकरी मंडळाचे प्रमुख दीपक जोशी यांनी केले. यानिमित्ताने गावातील रेशीमच्या एकूणच विस्ताराचा व रेशीम कोष उत्पादकांमधील सामंजस्यांचा उहापोह करण्यात आला. तू आणि ती एकत्र आली तर काय क्रांती होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगाव मधील रेशीम कोष उत्पादकांनी केलेली अर्थक्रांती, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यंदा पहिल्यांदाच सुरू केलेली ही परंपरा पुढे कायम ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी बोलून दाखविला. आभार श्री. जोशी यांनी मानले. कार्यक्रमाला देवगाव येथील रेशीम कोष उत्पादकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

...यांचा झाला गौरव

रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या शेतकरी दांपत्यांपैकी जनार्दन कचरू गीते व सौ. सीमा जनार्दन गीते यांना प्रथम क्रमांकाचे, रमेश कोठुळे व सौ. संगीता रमेश कोठुळे यांना द्वितीय क्रमांकाचे तर अनिल ढगे व गंगासागर अनिल ढगे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, साडी चोळी व रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरूप होते त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख पारितोषिक सात हजार द्वितीय पारितोषिक तीन हजार तर तृतीय पारितोषिक तीन हजार प्रदान करण्यात आले.

देवगावचे हे विशेष

केवळ सामान्य शेतकरीच नाही तर देवगावचे सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक प्रयोगशील व सधन शेतकरी रेशीम कोष उत्पादन करतात. गावात सुमारे २९ किलोमीटर शेतरस्ते झाल्याचे शेतकरी सांगतात. सुमारे ३०० एकर पर्यंत तुती क्षेत्र विस्तारले असून अंडीपुंज साठी लागणाऱ्या रेशीम कोशाचे उत्पादन शेतकरी घेतात.

रेशीम मधीलच नव्हे तर एकूणच कुटुंबाच्या अर्थकारणात महिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक स्वयंसिद्धांनी हे सिद्ध केले आहे. वाचन संस्कृती जोपासणाऱ्या देवगावच्या रेशीम कोष उत्पादकांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल.
- संतोष शाळिग्राम, संपादक, सकाळ, मराठवाडा आवृत्ती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT