Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Farming: खानदेशात मृग बहर केळी लागवड वाढण्याचे संकेत

Khandesh Farm Update:खानदेशात मृग बहरातील अर्ली केळी लागवड पूर्ण झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात सुमारे आठ ते १० हजार हेक्टरने वाढू शकते, असे संकेत आहेत. केळीचे दर मध्यंतरी कमी झाले होते.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात मृग बहरातील अर्ली केळी लागवड पूर्ण झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात सुमारे आठ ते १० हजार हेक्टरने वाढू शकते, असे संकेत आहेत. केळीचे दर मध्यंतरी कमी झाले होते. सध्या दर टिकून आहेत. इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला आहे. कारण दर कमी अधिक झाले.

केळी पीक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी परवडले. कांदेबाग केळी व मृग बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले. जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू होते. तर कांदेबाग केळीची काढणी दसरा सणापासून सुरू होत असते. सध्या उशिराच्या मृग बहर केळीची काढणी काही भागात सुरू आहे.

या केळीला किमान १४०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. मृग बहर केळीची लागवड मे महिन्यात सुरू होते. अर्ली लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते. ही लागवड पूर्ण झाली आहे. नियमीत लागवड जूनच्या मध्यापासून सुरू होते.

रोपांना मागणी

या केळीसाठी शेतकरी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग करीत आहेत. ही रोपे खानदेशात विविध कंपन्यांतर्फे पुरविली जात असून, रोपांचा पुरवठा सुरळीत आहे. जागेवर १८ ते २१ रुपये प्रतिरोप, असे दर रोपांचे आहेत. रोपांच्या चांगल्या उगवणक्षमतेसाठी कीडनाशके व अन्य बाबींची आळवणी रोपांभोवती करीत आहेत. कुकुंबर मोझॅकला प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT