Tiger In Sahyadri Forest agrowon
ॲग्रो विशेष

Tiger In Sahyadri Forest : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचे दर्शन

Striped Tiger Satara : वाघाचे दर्शन घडल्याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

sandeep Shirguppe

Sahyadri Tiger Reserve forest : कोल्हापूर, बेळगाव आणि सातारा जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक प्राण्याचे वास्तव्य आहे. दरम्यान व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अनेक वेळा दर्शन झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. दरम्यान पुन्हा एकदा वाघाचे दर्शन घडल्याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. प्रकल्पात लावलेल्या कॅमेऱ्यात त्याच्या हालचाली कैद झाल्या असून, प्रकल्पात ठिकठिकाणी पायांचे ठसे आणि विष्ठाही आढळून आली आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध आहे.

या प्रकल्पात शेकडो प्रकारचे प्राणी तसेच पक्षी वास्तव्यास आहेत. यापूर्वी तीन ते चार वेळा प्रकल्पात वाघाचे दर्शन झाले होते. सुरुवातीला वाघाच्या पायाचे ठसे तसेच विष्ठा आढळून आल्या होत्या.

मात्र, त्यानंतर ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यात वाघांचे फोटो कैद झाले होते. अशातच प्रकल्पातील जंगल भागात १२ डिसेंबर रोजी वाघाच्या पायांचे ठसे मिळाले. ही बाब फिरती करणाऱ्या वनरक्षक व वनमजूर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती वनक्षेत्रपालांना दिली.

त्यानंतर सलग तीन दिवस जंगल क्षेत्रात वाघाच्या पायांचे ठसे तसेच विष्ठा शोधण्यात आली. वाघाचा अधिवास असल्याचे पुरावे हाती आल्यानंतर वनविभागाकडून प्रकल्पात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी १७ डिसेंबर रोजी पहाटे ४:५९ वाजता एका पट्टेरी वाघाचा वावर आढळून आला.

आशादायी चित्र

या वाघाच्या हालचाली कॅमेच्यामध्ये कैद झाल्या आहेत. सह्याद्री प्रकल्पात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आल्यामुळे ही बाब आशादायी असल्याचे वनविभाग तसेच प्राणी अभ्यासकांकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT