Kaas Plateau Satara : कास पठार झाले खुले पण पहायला मिळतील का रंगबेरंगी फुले?

sandeep Shirguppe

कास पठार फुलांचा रंगोत्सव

१ सप्टेबरपासून कास पठारावर फुलांचा रंगोत्सव पाहण्यास खुला करण्यात आला आहे. दरम्यान पठारावर विविध प्रकारची फुले पाहून मनमोहून जात आहे.

Kaas Plateau Satara | agrowon

रंगबेरंगी फुलांचा गालिचा

कास पठारावर कुमुदिनी, सोनकी, जांभळा तेरडा, दीपकाडी, गेंद, कंद, पंद, भुई कारवी अशा रंगीबेरंगी फुले पहायला मिळता.

Kaas Plateau Satara | agrowon

डोळ्यांचे पारणे फिटते

कमी पावसामुळे पठारावर तुलणेने फुलांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. परंतु डोंगररांगा हिरव्यागार दिसत असल्याने डोळ्यांना समाधान वाटते.

Kaas Plateau Satara | agrowon

फुलांचा रंगोत्सव

फुलांचा खरा रंगोत्सव सप्टेंबरच्या अखेरीस पहायला मिळण्याची शक्यता तिथल्या स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Kaas Plateau Satara | agrowon

फुलपाखरांच्या ३२ प्रजाती

कास पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मीळ अशा सुमारे ८५० पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत.

Kaas Plateau Satara | agrowon

काळजी घ्या

सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १९ प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या १० प्रजाती आणि पक्ष्यांच्या ३० प्रजाती आढळतात अशी कास पठारावरील प्रशासनाकडून देण्यात येते.

Kaas Plateau Satara | agrowon

कास व्यतिरिक्त हे पहा

कास पठारासारखेच आणखी जवळपास १६ सडे आजूबाजूला आहेत. वेगवेगळी फुले, वनस्पतींबरोबरच पर्यटकांसाठी छोटे-मोठे झरे, धबधबे हे कास परिसराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

Kaas Plateau Satara | agrowon

जागतिक वारसा स्थळ

कास पठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून समाविष्ट करण्यात आले आहे.

Kaas Plateau Satara | agrowon

साताऱ्यातून असे जा

सातारा शहरापासून (महामार्ग) अवघ्या २५ कि.मी. वर हे पठार वसले आहे. साताऱ्यात आल्यानंतर राजवाडा किंवा समर्थ मंदिर व तेथून पुढे बोगद्याच्या अलीकडून यवतेश्वर घाटातून जावे लागते.

Kaas Plateau Satara | agrowon

सातारा महामार्गापासून ३० मिनीटात

पुणे ते सातारा हे ११० कि.मी. अंतर असून, कोल्हापूर ते सातारा हे अंतर १२५ कि.मी. आहे. साताऱ्यात महामार्गापासून पठारापर्यंतचे अंतर सुमारे २५ किलोमीटर भरते.

Kaas Plateau Satara | agrowon
almond benefits | Agrowon