Siddheshwar Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Siddheshwar Sugar Factory : ‘सिद्धेश्वर’ने पुन्हा त्याच जागी चिमणीसाठी परवानगी मागितली

Sugar Factory Chimney Update : श्री सिद्धेश्वर साखर कारखाना सुरळीत चालण्यासाठी पूर्वीच्याच जागेवर ५० ते ६५ मीटर उंचीची चिमणी उभारणीस परवानगी मिळावी, अशी मागणी पुन्हा कारखान्याच्या वतीने माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी ‘डीजीसीए’कडे केली आहे.

Team Agrowon

Solapur News : श्री सिद्धेश्वर साखर कारखाना सुरळीत चालण्यासाठी पूर्वीच्याच जागेवर ५० ते ६५ मीटर उंचीची चिमणी उभारणीस परवानगी मिळावी, अशी मागणी पुन्हा कारखान्याच्या वतीने माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी ‘डीजीसीए’कडे (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) केली आहे.

मात्र, ५० मीटरपेक्षा जास्त उंचीची चिमणी त्याच ठिकाणी उभारल्यास होटगी रोड विमानतळास पुन्हा अडचणी येऊ शकते, असे विमानतळ विकास प्राधिकरणाने ‘डीजीसीए’समोर स्पष्ट केले आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नुकतेच सोलापूर विमानतळाचे वरिष्ठ अधिकारी व श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तत्पूर्वी, चार-पाच वेळा यासंदर्भात 'डीजीसीए'कडे बैठका पार पडल्या असून, काही दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

तूर्तास ‘आमचा कारखाना सुरळीत चालू राहावा, यासाठी पूर्वीच्या चिमणीच्या जागेवरच ५० ते ६५ मीटरपर्यंत चिमणी उभारायला परवानगी द्या’ असे म्हणणे कारखान्याच्या वतीने श्री. काडादी यांनी दिले आहे. ५० मीटरपेक्षा कमी उंचीची चिमणी कारखान्यासाठी कोणत्याही फायद्याची नाही, असेही कारखाना प्रशासनाकडून ‘डीजीसीए’ला सांगण्यात आले.

त्यामुळे ‘तुमच्या नियमात बसेल एवढ्या उंचीची चिमणी उभारू, पण किमान ५० ते ५५ मीटरपेक्षा कमी नकोच’ अशी भूमिका श्री सिद्धेश्वर कारखाना प्रशासकांनी घेतली आहे. त्यावर ‘डीजीसीए’ निर्णय घेणार आहे. शेतकऱ्यांचा कारखाना सुरळीत चालावा म्हणून चिमणी पाडू नये, यासाठी खूप प्रयत्न केले.

पण, अडथळ्यांचा सर्व्हे चुकलेला असतानाही नगरविकास विभागाचा नियम पुढे करून चिमणी जमीनदोस्त करण्यात आली. आता कमी उंचीची चिमणी उभारायला परवानगी मागत आहोत, पण त्यावर निर्णय झालेला नाही. आतापर्यंत सहावेळा ‘डीजीसीए’च्या अधिकाऱ्यांशी बैठका झाल्या आहेत. पुढच्या काही दिवसांत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, असे कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT