Summer Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : उन्हाळी पेरण्यांना टंचाईची झळ

Sowing Update : उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा पाणीटंचाईची झळ उन्हाळी पेरण्यांना बसल्याचे दिसून येते.

Team Agrowon

Pune News : उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा पाणीटंचाईची झळ उन्हाळी पेरण्यांना बसल्याचे दिसून येते. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या २७ हजार ६२५ हेक्टरपैकी २५ हजार ७ हेक्टर म्हणजेच ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पेरणीच्या क्षेत्रात जवळपास ९ हजार ७३३ हेक्टरने घट झाली आहे. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांच्या समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी सरासरी क्षेत्राच्या २७ हजार ६२५ हेक्टरपैकी ३४ हजार ७४० हेक्टर म्हणजेच १२६ टक्के पेरण्या झाल्या होत्या. परंतु पाणी टंचाईची झळही काही ठिकाणी बसली असल्याने पुणे विभागात पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट झाली आहे.

त्यातच मागील काही वर्षांपासून उन्हाळ्यात चारा टंचाईचा मोठा प्रश्न उद्‌भवत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकाच्या पेरणीकडे वळू लागले आहेत.

परिणामी विभागात उन्हाळी पिकाच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी कमीअधिक पाऊस झाला असला तरी काही भागात जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

त्यामुळे रब्बीच्या पेरण्या उशिराने झाल्या होत्या. सध्या पुणे विभागात पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पेरण्यांवर भर दिला आहे. परंतु पाणी टंचाईमुळे काही ठिकाणी पिके जळून गेल्यात जमा आहेत.

नगरमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची ९० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. गहू पिकाची ८५ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. मका पिकाची ५५ ते ६० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे.

हरभरा पिकाची ९५ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. उन्हाळी हंगामातील मका पिकाची ३१०३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरी पिकाची ४००५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भुईमूग पिकाची २६८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकाची १२१ हेक्टरवर पेरणी झाली असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकाची ९५ टक्के, हरभरा पिकाची ९८ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. उन्हाळी हंगामातील मका पिकाची ३०३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. उन्हाळी बाजरी हंगामातील बाजरी पिकाची ३८२० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

उन्हाळी भुईमुगाची २०९९ हेक्टरवर पेरणी झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोलापूरमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. मका, गहू व हरभरा काढणी अंतिम टप्प्यात आहे. उन्हाळी हंगामातील मक्याची ४२०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. भुईमूग पिकाची १४४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हाळी बाजरीची १७४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

जिल्हानिहाय झालेली पेरण्या : (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्के

नगर ८८८६ १०,०३७ ११३

पुणे ११०९४ ९,११० ८२

सोलापूर ७६४५ ५८६० ७७

एकूण २७,६२५ २५,००७ ९१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT