ॲग्रो विशेष

Banana Farming: केळी कंदांचा खानदेशामध्ये तुटवडा

Khandesh Agriculture: खानदेशात केळीची लागवड बारमाही केली जात आहे. केळी लागवड सुरूच असून, यंदा लागवडीत मोठी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात केळीची लागवड बारमाही केली जात आहे. केळी लागवड सुरूच असून, यंदा लागवडीत मोठी वाढ झाली आहे. यात लागवडीसाठी दर्जेदार किंवा हव्या त्या कंपनीची उतिसंवर्धित रोपे मिळत नसल्याने शेतकरी कंद लागवडीस पसंती देत आहेत. 

उतिसंवर्धित केळी रोपांचे दरही वाढले आहेत. यामुळे कंदांच्या लागवडीस शेतकरी पसंती देत आहेत. यात केळी कंदांचे दरही प्रतिकंद चार ते पाच रुपये, असे आहेत. खानदेशात उतिसंवर्धित रोपांसह केळी कंदांचा उपयोग केळी लागवडीसाठी केला जात आहे. केळीला रोजगार हमी योजनतून मोठे अनुदान मिळत आहे.

कापूस दर कमी असून, कापूस पीक तोट्यात आले आहे. केळीचे दर मध्यंतरी टिकून होते. केळीला मजुरी खर्चही अन्य पिकांपेक्षा कमी असून, अलीकडे १० ते ११ महिन्यात केळीची काढणी होऊन उत्पादन, उत्पन्न हाती येते. केळी व्यापारातही अलीकडे सुसूत्रता आहे. जलसाठे मुबलक आहे. ठिबकमुळे कमी पाण्यात चांगले उत्पादन येते.

दर्जेदार केळी उत्पादन अनेक गट घेत असून, केळी निर्यातीसही गती आली आहे. शिवाय केळीस पीकविमा योजनेतून विमा संरक्षणही आहे.  केळी पिकातील जोखीम कमी झाली आहे. यामुळे केळी लागवडीकडे अनेकांचा ओढा आहे. केळीची लागवड २०२४-२५ मध्ये सुमारे ७४ ते ७६ हजार हेक्टर एवढी एकट्या जळगाव जिल्ह्यात झाली.

यंदा यापेक्षा अधिक लागवड होणार आहे.  केळीचे कंदही फारसे खानदेशात उपलब्ध नाहीत. रावेर, यावलमध्ये काही शेतकऱ्यांकडे कंद आहेत. शेतकरी उतिसंवर्धित केळी रोपांच्या बागांमधील कंदांची मागणी करीत आहेत. अशा बागा खानदेशात सध्या फारशा काढणीवर नाहीत. यामुळे दर्जेदार किवा हवे तसे कंद उपलब्ध होत नसल्याची स्थिती खानदेशात असून, मागणी अधिक व कंद पुरवठा कमी दिसत आहे. 

मजुरांची समस्या

केळी लागवडीची मजुरी एक हजार ते ११०० रुपये प्रति एक हजार रोपे किंवा एक हजार कंदांवरून १२०० रुपये प्रति एक हजार कंद किंवा रोपे एवढी झाली आहे. केळी लागवडीसाठी गावोगावी कुशल मजूरगट तयार झाले आहे. या मजुरांची विविध भागात मागणी आहे. यात केळी लागवडीची मजुरीदेखील आता १२०० रुपये प्रति एक हजार कंद अशी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

SCROLL FOR NEXT