Drone Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Drone Technology : ड्रोन तंत्रज्ञान योजनेस अल्प प्रतिसाद; अनुदानासाठी अल्प अर्ज

Agriculture Drone Scheme : खतांचा वापर कमी करण्यासह मजूरटंचाईची समस्या दूर करण्यासाठी आणि युरिया, डीएपी व इतर खतांच्या नॅनो खतांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव : खतांचा वापर कमी करण्यासह मजूरटंचाईची समस्या दूर करण्यासाठी आणि युरिया, डीएपी व इतर खतांच्या नॅनो खतांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले असून, त्याबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.

या योजनेतून शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागासह लोकप्रतनिधींनी मागील वर्षभरात अनेकदा केले. परंतु या योजनेस अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

जळगावात जिल्हाभरातून २०० अर्जदेखील सादर झालेले नाहीत. ड्रोनद्वारे फवारणीबाबत ठोस शिफारशी नाहीत. तसेच हे तंत्रज्ञान मोठे उपयोगाचे ठरल्याचेही जिल्ह्यात प्रयोग झालेले नाहीत. ऊस पिकात नंदुरबारमध्ये फवारणीचे प्रयोग झाले. त्यासही प्रतिसाद ऊस उत्पादकांनी दिलेला नाही.

ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापना करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, ग्रामीण नव उद्योजक, कृषी पदवीधर असलेले, अवजारे बँक (सेवा सुविधा केंद्र) हे पात्र आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, ग्रामीण नव उद्योजक यांना ४० टक्के किंवा कमाल चार लाख रुपये अनुदान देय असणार आहे.

कृषी पदवीधर यांना अपग्रेडिंग कस्टम हायरिंग सेंटरकरिता ५० टक्के किंवा कमाल पाच लाख रुपये अनुदान देय आहे. नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतही यासंबंधी शेतकरी, गटांत उदासीनता आहे. महिलांना ड्रोन दिदी बनविण्याची घोषणा मध्यंतरी शासनाने केली. पण यासंबंधी ठोस कार्यवाही ग्रामपातळीवर सुरू नसल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT