Vighnahar Sugar Factory Election Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Election : ‘विघ्नहर’वर शेरकर यांचेच वर्चस्व

Co-Operative Sugar Mill Election : मतमोजणीसाठी तहसीलदार डॉ. सुनील शेळके, सचिन मुंढे, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Team Agrowon

Pune News : देशातील निवडक सहकारी साखर कारखान्यांमध्ये नावाजलेल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या (निवृत्तीनगर, शिरोली, ता. जुन्‍नर) पंचवार्षिक निवडणुकीत संचालकांच्या २१ पैकी चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलचे चारही उमेदवार रविवारी (ता. १६) झालेल्या मतमोजणीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यामुळे ‘विघ्नहर’वर शेरकर यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.

उत्पादक मतदार संघांच्या शिरोली गटाच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली. यात शिवनेर पॅनेलचे विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर (१०,४२३), सुधीर खोकराळे (१०,०५७) व संतोष खैरे (१०,०२५) मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या विरोधात रहेमान इनामदार यांना अवघी (३४९) मते मिळाली. एकूण मते - ३१,८५१, वैध मते - ३०,८५४ व ९९७ मते अवैद्य ठरली.

इतर मागासवर्गीय मतदार संघाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार होते. यामध्ये सुरेश गडगे (९,९२०) विंजयी झाले. तर नीलेश भुजबळ यांना अवघी २२१ व रहेमान इनामदार यांना अवघी ११६ मते मिळाली. एकूण मते १०,६१७, वैध मते - १०,२५७, तर ३६० मते अवैध ठरली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. मतमोजणीसाठी तहसीलदार डॉ. सुनील शेळके, सचिन मुंढे, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बिनविरोध घोषित करण्यात आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :

उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघ जुन्नर गट (तीन जागा) : देवेंद्र खिलारी, अशोक घोलप, अविनाश पुंडे

ओतूर गट (चार जागा) : बाळासाहेब घुले, धनंजय डुंबरे, पंकज वामन, रामदास वेठेकर

पिंपळवंडी गट (तीन जागा) : विवेक काकडे, प्रकाश जाधव, विलास दांगट

घोडेगाव गट (तीन जागा) : यशराज काळे, दत्तात्रेय थोरात, नामदेव थोरात

अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ (एक जागा) : प्रकाश सरोगदे

भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदार संघ (एक जागा) : संजय खेडकर

महिला राखीव (दोन जागा) ः नीलम तांबे, पल्लवी डोके

हा विजय सर्व सभासदांच्या विश्वास व सहकार्यामुळेच मिळाला आहे. आजपर्यंत आपल्या कारखान्याचे सर्व संचालक शेतकरी व संस्थेच्या हितासाठी सक्षमपणे कार्यरत राहिले आहेत. पुन्हा एकदा आपण सर्वजण एकजुटीने कारखान्याच्या प्रगतीसाठी कार्य करत राहू. सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अविरत प्रयत्नशील राहणार.
- सत्यशील शेरकर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT