Shikhar Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Shikhar Bank : शिखर बँकेचा स्वनिधी ६५०० कोटींच्या पुढे

Bank Update : देशातील सहकारी बँकांसमोर खासगी बँकांनी मोठे आव्हान उभे केलेले असताना महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेची जोरदार घोडदौड चालू आहे.

Team Agrowon

Pune News : देशातील सहकारी बँकांसमोर खासगी बँकांनी मोठे आव्हान उभे केलेले असताना महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेची जोरदार घोडदौड चालू आहे. विशेष म्हणजे बँकेचा स्वनिधी आता साडेसहा हजार कोटींच्या पुढे गेला आहे.

कधीकाळी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिखर बँकेच्या प्रशासकपदी विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती झाल्यानंतर बँकेचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली. शिखर बँकेची सध्याची प्रगती देशातील सहकार तज्ज्ञांना आश्चर्यचकित करून सोडणारी आहे. श्री. अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली शिखर बँकेच्या झालेल्या ११३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या नेत्रदीपक प्रगतीचा अहवाल सादर करण्यात आला.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात शिखर बँकेने ५७ हजार २६५ कोटींची उलाढाल केली आहे. त्यातून बँकेला ढोबळ नफा ९८७ कोटी रुपये; तर निव्वळ नफा ६१५ कोटी रुपयांचा झाला आहे. स्वनिधी आता ६ हजार ५३० कोटी रुपयांवर गेला असून बँकेने सतत बारा वेळा लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग प्राप्त केला. अहवालातील ही प्रगती पाहून उपस्थित सभासदांनी बँकेच्या प्रशासनाचा अभिनंदनचा ठराव मांडला व एकमताने मंजूर केला.

श्री. अनास्कर यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही सुखद धक्का दिला आहे. त्यांनी देशातील पहिली सहकारी कर्मचाऱ्यांची आजीवन उदरनिर्वाह योजना शिखर बँकेला लागू केली आहे. त्यानुसार बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे दरमहा दहा हजार रुपये उदरनिर्वाह निधी आजीवन मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात बँकेतील ५०० पेक्षा जास्त निवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होईल.

दरम्यान, बँकेचे नक्तमूल्य आता आठशे कोटी रुपयांनी वाढून ४ हजार ६१८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. राज्य शिखर बँक आता देशातील आर्थिक शिस्त पाळणारी सर्वात मोठी सहकारी बँक समजली जाते. रिझर्व बँकेच्या नियमानुसार, बँकांना भांडवल पर्याप्तता प्रमाण किमान नऊ टक्के राखणे आवश्यक असते. शिखर बँकेने हेच प्रमाण सोळा टक्क्यांच्या पुढे ठेवत रिझर्व बँकेला चकित केले आहे.

बँकेच्या कर्ज वाटप प्रमाणावर (सीडी रेशो) प्रशासनाने चांगला अंकुश ठेवला आहे. त्यामुळे हे प्रमाण सध्या ८१.५० टक्के राखण्यात यश आलेले आहे.शिखर बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, श्री. अनास्कर यांच्या माध्यमातून राज्यात शिखर बँकेची प्रतिमा सतत उजळत असून आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यवहारात तब्बल १२ हजार कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. दुसऱ्या बाजूला अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण केवळ १.६६ इतके अत्यल्प ठेवत बँकेने इतर सहकारी बँकांसमोर आदर्श ठेवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supreme Court On MSP : महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांची जनहित याचिका ; हमीभावबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले निर्देश

Maharashtra Heatwave: मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट; कोकणात तीन दिवस उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'च्या नावाखाली फसवणूक, आदिती तटकरेंनी घेतली गंभीर दखल, दिला महत्त्वाचा सल्ला

Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेची कामे ठप्प

Orange Farming: उन्हाळ्यात संत्रा बागेत घ्यावयाची काळजी

SCROLL FOR NEXT