Kisan Agricultural Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Exhibition Shet Hasal : ‘शेत हसल’: सकारात्मक कृषी व्यावसायिकतेचा खजिना

Agriculture Exhibition : कृषी क्षेत्राशी संबंधित विषय निघाला की अनेकांचा काळजीचा सूर लागतो. पण योग्य दिशेने प्रयत्न केले तर मार्ग नक्कीच सापडतो. त्यासाठीच ‘स्वयं टॉक्स’ आणि ‘ॲग्रोवन’ आयोजित करत आहे

Team Agrowon

Pune News : कृषी क्षेत्राशी संबंधित विषय निघाला की अनेकांचा काळजीचा सूर लागतो. पण योग्य दिशेने प्रयत्न केले तर मार्ग नक्कीच सापडतो. त्यासाठीच ‘स्वयं टॉक्स’ आणि ‘ॲग्रोवन’ आयोजित करत आहे ‘शेत हसल.’ प्रतिकूल स्थितीतही उत्तम शेती कशी करावी, कोणते जोडउद्योग करावेत, आधुनिक तंत्रज्ञानाची मदत कशी घ्यावी? अशा अनेक विषयांची माहिती या कार्यक्रमातून मिळणार आहे.

पुण्यातील ‘किसान’ प्रदर्शनात १२ ते १४ डिसेंबर या काळात सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत कृषी विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात १३ डिसेंबर रोजी ४.३० ते ५.३० वाजता ‘एटीएमए’ संस्थेचे निवृत्त संचालक दशरथ तांभाळे आणि सीएसआर प्रकल्पाचे प्रमुख अनिल दधिच हे ‘शेतीच्या विकासासाठी शासकीय व खासगी योजना’ या विषयावर माहिती देणार आहेत.

याच सत्राच्या दुसऱ्या भागात ५.३० ते ६.३० या वेळेत ‘पानी’ फाउंडेशनचे मुख्य सल्लागार डॉ. अविनाश पोळ ‘पानी फाउंडेशनने महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात परिवर्तन कसे घडवले’ याची माहिती देणार आहेत. डॉ. पोळ हे पेशाने दंतवैद्य असले तरी त्यांनी पंचवीस वर्षे दुष्काळ निवारण, शेती, पाणलोट क्षेत्र विकास, ग्रामीण प्रशिक्षण या क्षेत्रांत झोकून देत काम केले आहे.

शेतकरी, कृषी अभ्यासक आणि कृषी प्रेमींसाठी हा कार्यक्रम नक्कीच पर्वणी ठरेल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तज्ज्ञ मंडळींना तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न वा शंका विचारू शकता. म्हणूनच शेतकरी, कृषी अभ्यासक आणि कृषी प्रेमींसाठी हा कार्यक्रम नक्कीच पर्वणी ठरेल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंकवर / QR Code स्कॅन करून लवकरात लवकर आपले नाव नोंदवा. http://shethustle.kisan.in/

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry Problems Solution: साखर उद्योगांसमोरील समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती

Grape Pruning: द्राक्ष पट्ट्यात ‘खरड’ छाटणी वेगात

Agri Shop License Suspension: पंधरा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Sanjay Gaikwad Controversy: आमदार संजय गायकवाड यांचे विधान विकृत : सपकाळ

Summer Bajra Harvesting: उन्हाळी बाजरी पीक काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT