Pomegranate Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad King Pomegranate : ‘शरदकिंग’ डाळिंबाच्या पाहणीसाठी शरद पवार उद्या खिलारवाडीत

Sharad Pawar : छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल भोसले यांनी शरदकिंग हे डाळिंबाचे वाण संशोधित केले आहे.

Team Agrowon

Solapur News : खिलारवाडी (ता. सांगोला) येथील माजी सरपंच, प्रगतशील बागायतदार दत्तात्रय राजाराम नागणे यांनी लागवड केलेल्या ‘शरदकिंग’ या नवीन वाणाच्या डाळिंब बागेच्या पाहणीसाठी ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार हे शनिवारी (ता. १०) खिलारवाडीला भेट देणार आहेत.

सकाळी दहा वाजता श्री. पवार येथे येतील. या डाळिंबाच्या बागेच्या पाहणीसह त्याची वैशिष्ट्ये ते जाणून घेतील. अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थाकीय संचालक विलास शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, प्रगतशील डाळिंब उत्पादक विठ्ठल भोसले आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल भोसले यांनी शरदकिंग हे डाळिंबाचे वाण संशोधित केले आहे. त्यांच्याकडून रोपे आणून श्री. नागणे यांनी या वाणाची लागवड केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना श्री. चांदणे म्हणाले, की नागणे यांनी शरदकिंग डाळिंबाच्या लागवडीचा प्रयोग केला आहे. आकार आणि रंगाच्यादृष्टीने हे वाण चांगले आहे, विशेषतः आकारमानाने ते मोठे आहे, डाळिंब केंद्राकडूनही त्यावर काम झालेले आहे. या वाणाचे निष्कर्ष चांगले निघाल्यास शेतकऱ्यांना चांगला पर्याय मिळू शकेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT