Shaktipeeth Highway kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : कंत्राटदारांचे खिसे भरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, कलेक्टर ऑफिसवर निघणार विराट मोर्चा

sandeep Shirguppe

Nagpur Goa Mahamarg : नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ राज्यातील १२ जिल्ह्यातून जात आहे दरम्यान यामध्ये शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टवर जमिनी जाणार असल्याने याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्याचे आदेश देण्यात आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी १८ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात येणार आहेत.

शासनाने २८ फेब्रुवारीला गॅझेट नोटिफिकेशन द्वारे जाहीर करून बारा जिल्ह्यातील गोवा ते नागपूर या शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करत असल्याचे जाहीर केले. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये आंदोलने सुरू झाली. निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व पक्षीयांची मोट बांधून पुढील दिशा ठरवण्यासाठी शहाजी कॉलेज येथे बैठक झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील प्रचारसभेत शक्तिपीठ महामार्ग होणारच असल्याचे सांगितले होते.

याबद्दल या दोघांचा निषेध करण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावे बंद ठेवून सहकुटुंब १८जूनला दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सकाळी दहा वाजता मोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

शासनाने बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणती कल्पना न देता हुकूमशाही पद्धतीने हा निर्णय लाभला आहे. पर्यायी रस्ते उपलब्ध असताना ८५ हजार कोटी रुपये खर्च करून कंत्राटदारांचे किसे बनणारा हा महामार्ग शेतकऱ्यांच्या वर व जनतेवर लादला आहे. अशा भावना मान्यवरांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या. हा महामार्ग निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या मोर्चाच्या तयारीसाठी तालुकावार मेळावे, गाववार बैठका घेऊन जनजागृती करण्याचे ठरले. हा मोर्चा केवळ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचाच न होता संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी कामगार कष्टकरी महिला पक्ष संघटना यांच्या एकजुटीने यशस्वी करण्याचा निर्णय करण्यात आला.

शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीला विधान परिषद गटनेते सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजय बाबा घाटगे, श्रमीक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे.

विक्रांत पाटील, सम्राट मोरे, प्रकाश पाटील, प्रशांत आंबी, शशिकांत खोत, जम्बू चौगुले, हरीश कांबळे, शिवाजी मगदूम, आनंदा पाटील, योगेश कोळमोवडे, सर्जेराव देसाई, नामदेव पोवार, राम करे, रवींद्र जाधव, शिवाजी कांबळे, नितीन मगदूम, नवनाथ पाटील, तानाजी भोसले, पंकज चौगुले, संतोष पोवार, आनंदा देसाई, कृष्णा भारतीय, नवनाथ पाटील, शरद पाटील, शामराव पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT