Shahu Maharaj Chhatrapati  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : 'स्वाभिमानी'च्या ऊस दर आंदोलनाला शाहू महाराजांचा पाठिंबा

Shahu Maharaj Chhatrapati : ऊस दर वाढीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला शाहू महाराज छत्रपतींनी पाठिंबा दिला.

sandeep Shirguppe

Kolhapur News : ऊस दर वाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून पुणे-बेंगलोर महामार्गावर चक्का जाम आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनाला शाहू महाराज छत्रपतींनी शिरोली येथे आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

गत गळीत हंगामातील उसाला १०० रुपये आणि यंदाच्या ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू आहे. मात्र, त्याच्या मागणीकडे साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केल्याने आजपासून माजी खासदार राजू शेट्टी यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

आज सकाळपासून हजारोच्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी महामार्गावर शिरोली पुलाजवळ जमू लागले. त्यामुळे परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांच्यांशी फोनवर संवाद साधला. पण शेट्टी आपल्या मागण्यांवर ठाम असून कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका जाहीर केली. राजू शेट्टीसह हजारो शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे. दुपारी शाहू महाराज छत्रपती यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला

यावेळी आंदोलकांशी संवाद साधत असताना शाहू महाराज म्हणाले, राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून राजू शेट्टी ऊस दराच्या मागणीवरून आंदोलन करत आहेत. परंतु साखर कारखाने दखल घेतली नाही. सरकारही मध्यस्थी करताना दिसत नाही. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर मध्यस्थी करून मार्ग काढणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तडजोड करावी, असे आवाहन शाहू महाराजांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT