Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage Decline : चाळीसगाव तालुक्यातील जलसाठे घटले

Water Crisis : निम्म्या जिल्ह्याची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा केवळ ३५ टक्क्यांवर आला आहे. धरणातून आता पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने मिळणार आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे मध्यम व लघु प्रकल्पांमधील साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. उन्हाचे वाढते प्रमाण पाहता जूनपर्यंत बहुतांश धरणे तळ गाठण्याची शक्यता आहे. निम्म्या जिल्ह्याची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा केवळ ३५ टक्क्यांवर आला आहे.

धरणातून आता पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने मिळणार आहेत. तालुक्यातील १४ लहान धरणांपैकी तीन धरणे कोरडीठाक झाली असून, उर्वरित धरणांमध्ये जेमतेम साठा शिल्लक आहे. चाळीसगाव तालुक्यात मागीलवर्षी परतीचा चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे लहान व मोठ्या धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा झाला होता. या पाण्यामुळे रब्बी हंगामाला फायदा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, फेब्रुवारीपासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

तालुक्यात मन्याड मध्यम प्रकल्प असून १४ लघु प्रकल्प आहेत. दोेन वर्षांपूर्वी दुष्काळामुळे मन्याडमध्ये शून्य टक्के जलसाठा होता. गेल्या वर्षी नांदगावच्या माणिकपुंज धरण ओसंडून वाहिल्याने ‘मन्याड’ १०० टक्के भरले. तर नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गिरणा धरणही १०० टक्के भरले होते.

त्यामुळे गिरणातून आतापर्यंत सिंचनासाठी तीन आवर्तने सोडण्यात आली. या आवर्तनामुळे जवळपास २१ टक्के जलसाठा कमी झाला. आता तीव्र उन्हामुळे पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने आजच्या घडीला हा जलसाठा ३५ टक्क्यांवर आला आहे.

पाणीसाठा होतोय कमी कमी...

तालुक्यातील वलठाण धरणात ६ मार्चला ८.०४ टक्के जलसाठा होता, आता वलठाण धरणही कोरडे पडले आहे. कुंझर- २ हे धरण ११.५८ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आले आहे. राजदेहरे धरणही १२.१४ टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आले आहे.

एकूणच २३ दिवसात १० टक्के जलसाठा कमी झाला आहे. हातगाव- १ मध्ये अवघा ५ टक्के साठा असून पथराड १३ टक्के, बोरखेडा १२ टक्के, कृष्णापुरी ३५ टक्के, खडकीसीम २८ टक्के, वाघले- एकमध्ये २५ टक्के, वाघले दोनमध्ये २९ टक्के, पिंपरखेड २५ टक्के, ब्राह्मणशेवगे २१ टक्के असा जलसाठा सद्यःस्थितीत आहे. उन्हाचे तीव्र प्रमाण पाहता जूनपर्यंत ही धरणे तळ गाठण्याची चिन्हे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापसाचा वाढलेला भाव टिकून; हरभरा आवक वाढली, तूर दबावातच, सरकीचे दर टिकून तर पपईला मागणी

Weather Update in Maharashtra : मराठवाड्यात गारपीटीचा इशारा; कोकण, मध्यम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा अंदाज

Agriculture AI: ‘एआय’ तंत्रज्ञानातून कमी खर्चात सुरू उसाचे एकरी १०४ टन उत्पादन

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग बदलण्याचे श्रेय शेतकरी संघर्ष समितीला

Honoring Women Farmers: सन्मान महिलाशक्तीचा...

SCROLL FOR NEXT