Fodder Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : माळरानातही चारा संपला; खानदेशात टंचाईची स्थिती

Fodder Crisis : खरिपात चारा पिकांची कमी पेरणी झालेली असतानाच अतिपावसाने खानदेशात चाऱ्याची स्थिती खराब झाली.

Team Agrowon

Jalgaon News : खरिपात चारा पिकांची कमी पेरणी झालेली असतानाच अतिपावसाने खानदेशात चाऱ्याची स्थिती खराब झाली. आता माळरानातही चारा नाही. यामुळे चारा टंचाईची स्थिती आहे. माळरानात हिरवळ नाहीशी झाली आहे. खरिपात मका, ज्वारी पेरण्या खानदेशात कमी झाल्या होत्या. अतिपावसात मका, ज्वारीचा कडबा काळवंडला आहे. सोयाबीनचा भुसाही खराब झाला.

या कारणांमुळे खानदेशात शेतकऱ्यांनी साठविलेला चारा पशुधनासा घातला. हा चाराही संपत आला आहे. सध्या चाराटंचाई दिसत आहे. कारण माळरानासह पऱ्हाटी, तुरीचे शिवारही उजाड झाले आहे. त्यात चारा नाही. रब्बी पिकांचा चारा मार्चमध्ये उपलब्ध होईल. यामुळे चाऱ्यासाठी मोठा खर्चही करावा लागत आहे.

डिसेंबरमध्ये माळरानात हिरवळ असल्याने त्यात पशुधन चराईसाठी जात होते. पण सध्या हिरवळ नाहीशी झाली आहे. चाऱ्याची समस्या तयार झाली आहे. भाकड पशुधनास पोटभर चारा खाऊ घालणे अनेकांना कठीण बनले आहे. खानदेशात सुमारे १६ लाख पशुधन आहे. यात जळगाव जिल्ह्यात साडेआठ लाख पशुधन आहे.

खानदेशात दर महिन्याला पावणेतीन लाख टन चाऱ्याची गरज असते. जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, रावेर, यावल, चोपडा, पारोळा, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमध्ये नंदुरबार, शहादा हा भाग दूध उत्पादनात अग्रेसर आहे. यात शेळ्या-मेढ्यांची आणखी मोठी संख्या आहे. परंतु पशुधनाला पुढे पुरेसा चारा कसा आणावा, असा मुद्दा आहे.

दुधाळ पशुधनाला कोरडा चारा एकवेळ खाऊ घालावा लागतो. परंतु या पशुधनास एकवेळ कोरडा चारा किंवा कुट्टी, भुसा खाऊ घालणे कठीण झाले आहे. अनेकांनी आपल्याकडे हिरव्या चाऱ्याची लागवड केली आहे. त्याचा उपयोग शेतकरी करून घेत आहेत.

कोरडवाहू क्षेत्रात अधिक समस्या

सध्या केळी पट्ट्यात फुटवे, कंद, केळीची हिरवी पाने आदी पशुधनास घातली जात आहेत. अनेकांनी साठविलेला चारा संपला आहे. केळी पट्ट्यात चारा मुबलक असणार आहे. परंतु कोरडवाहू पिकांच्या क्षेत्रात चाऱ्याची समस्या तयार झाली आहे. ही समस्या जळगावात अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, बोदवड, धुळ्यातील शिंदखेडा, साक्री, नंदुरबारमधील नंदुरबार येथे अधिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT