Setu Suvidha Kendra Agrowon
ॲग्रो विशेष

Setu Suvidha Kendra : सोलापुरातील सेतू कार्यालय पुन्हा कार्यान्वित होणार

Solapur Setu Suvidha Kendra : नागरिकांना सर्व दाखले एकाच छताखाली मिळण्याचे केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्र, पण सोलापुरात निविदा प्रक्रिया संपल्याने ही केंद्रे बंद करण्यात आली.

Team Agrowon

Solapur News : नागरिकांना सर्व दाखले एकाच छताखाली मिळण्याचे केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्र, पण सोलापुरात निविदा प्रक्रिया संपल्याने ही केंद्रे बंद करण्यात आली.

पण ही सेतू केंद्रे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सेतू निविदा समितीची बैठक घेऊन सेतू केंद्र सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसांत ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा एकदा सेतू केंद्रे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

‘शासन आपल्या दारी’ योजनेअंतर्गत वेळ आणि लोकांच्या या केंद्रांपर्यंत पोहोचण्याच्या मर्यादा याचा विचार करता, सेतू केंद्राची सुविधा ही उत्तम असल्याचे दिसून आल्याने आता ही केंद्रे सुरू करण्यावर प्रशासन ठाम झाले आहे. त्यामुळेच यासंबंधीची बैठक घेऊन आता निर्णय घेण्यात आला आहे.

सेतू केंद्रात विलंब, जादाच्या पैशांची मागणी

सध्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात महा-ई-सेवा केंद्रांमधून दाखले देण्याची सोय करण्यात आली आहे. पण या केंद्रांवरून दाखले मिळण्यास विलंब तर होत आहेच. पण जादाचे पैसे हे केंद्र चालक घेत असल्याने नागरिकांतून संतापही व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने पुन्हा एकदा हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या १५४ मंडलाधिकारी, अव्वल कारकून, कारकून यांच्या बदलीसंदर्भात शनिवारी, रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात समुपदेशन घेण्यात आले. त्यानुसार आज (ता. ३१) सर्व १५४ कर्मचाऱ्यांचा बदलीचा आदेश निघेल, त्यानंतर ही प्रक्रिया राबवण्यास आणखी गती येईल.
तुषार ठोंबरे, प्रभारी जिल्हाधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT