Maharashtra State National Sugar Workers Federation Demand Agrowon
ॲग्रो विशेष

Tripartite Committee : आचारसंहितेपूर्वी त्रिपक्ष समिती स्थापन करा

Team Agrowon

Pune News : राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या कराराची मुदत संपून सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरी ही त्रिपक्ष समिती स्थापन करण्यासाठी शासन उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे. विधानसभा आचारसंहितेपूर्वी त्रिपक्ष समिती स्थापन करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनने साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्या वतीने साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची भेट सोमवारी (ता. ३०) घेऊन निवेदन दिले. या वेळी फेडरेशनचे संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, अशोकराव मिसाळ, संभाजीराव माळवदे, संजय राऊत, आप्पासाहेब शिंदे, राहुल टिळेकर, रमेश यादव आदी उपस्थित होते.

साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपली आहे. एक एप्रिल २०२४ पासून राज्यातील साखर उद्योगातील व जोड धंद्यातील कामगारांच्या वेतनात वाढ व सेवाशर्थीत बदल होण्यासाठी त्रिपक्ष समिती तातडीने स्थापन करण्यासाठी आपणास ५ ऑगस्ट २०२४ रोजी नवीन मागण्यांची नोटीस दिलेली आहे.

तसेच साखर कामगारांच्या मागण्या व प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत ७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मंत्रालयामध्ये मंत्रिमहोदयांच्या दालनात कामगार संघटनांचे प्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत सहकार मंत्री वळसे पाटील यांनी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याबाबत कामगार आयुक्त व साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याबाबत सांगितले. त्याचबरोबर साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतर पुन्हा एकदा साखर कामगार नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन पुढील बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले होते.

दीड महिन्यानंतरही हालचाल नाही

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात बैठक होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असून, साखर कामगारांचे नवीन वेतनवाढ व सेवाशर्ती ठरविण्यांसाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करणे बाबत आजपर्यंत हालचाल होताना दिसून येत नाही. तरी आपण स्वत: लक्ष घालून विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्रिपक्षीय समिती स्थापण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Central government flood help : केंद्राकडून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपयांची मदत जाहीर

Indian Education : नागरिक घडविणारे ‘बुनियादी’ शिक्षण

Maharashtra Cabinet Decision : निर्णयांचा पाऊस, अंमलबजावणीचे काय?

Kondhane Dam Project Scam : कोंढाणे धरण प्रकल्पात १४०० कोटींचा घोटाळा

Namo Shetkari Mahasanman Scheme : ‘नमो महासन्मान’च्या पाचव्या हप्त्यासाठी २२५४ कोटी

SCROLL FOR NEXT