Turmeric Cultivation Discussion
Turmeric Cultivation Discussion Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Cultivation Discussion : आरडव येथे हळद, सोयाबीन, तूर, संत्रा लागवडीबाबत चर्चासत्र

Team Agrowon

Buldana News : ‘ॲग्रोवन’च्या पुढाकाराने लोणार तालुक्यातील आरडव येथे हळद, सोयाबीन, तूर, संत्रा लागवड व्यवस्थापन विषयावर बुधवारी (ता.१७) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. ‘ॲग्रोवन’ व रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

सध्या वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्याचे शेती पिकाचे नुकसान होत असून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे हळद पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर आरडव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सकाळी झालेल्या कार्यक्रमात हळद, सोयाबीन, तूर या पिकांच्या व्यवस्थापनाबाबत केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषी हवामानाविषयीच्या जागरूकतेला किती महत्व आहे यावर केव्हीकेचे हवामान तज्ज्ञ मनीष यदुलवार यांनी माहिती दिली. रिवुलीस इरिगेशनचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण सिद्धभट्टी यांनी ठिबक व कंपनीच्या इतर उत्पादनांविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

शशिकांत राठोड, भूषण वानखडे यांनीही कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती दिली. आरडव येथील युवा उद्योजक तथा प्रयोगशील शेतकरी गजानन व्यंकटराव सरकटे यांनी शेतीतील आपले अनुभव या कार्यक्रमादरम्यान मांडले.

चर्चासत्रासाठी लोणार येथील सरकटे एजन्सीजचे संचालक गजानन सरकटे, गणेश हाडे, प्रशांत हाडे, किशोर सरकटे, पुंजाजी मोरे, समाधान सरकटे, पंढरी येवले, भागवत सरकटे, राजू सरकटे, प्रताप सानप, परशुराम ढाकणे यांचे सहकार्य मिळाले.

‘सकाळ’चे अकोला आवृत्ती वितरण व्यवस्थापक संतोष जुमडे, ‘ॲग्रोवन’चे विदर्भाचे सहायक वितरण व्यवस्थापक सुनील धांडे (नागपूर), ‘ॲग्रोवन’ वितरण प्रतिनिधी अनंता शिंदे (अकोला), सचिन अवसरमोल (बुलडाणा) यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT