Seaweed Farming Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Seaweed Farming Project : आचरा खाडीत शेवाळ शेतीला प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana : पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आचरा येथील जामडूल खाडीत प्रायोगिक तत्त्वावर शेवाळ शेतीचा प्रकल्प सुरू करण्यात आला असून कोकणात आणखी तीन ठिकाणी हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आचरा येथील जामडूल खाडीत प्रायोगिक तत्त्वावर शेवाळ शेतीचा प्रकल्प सुरू करण्यात आला असून कोकणात आणखी तीन ठिकाणी हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या समुद्रशेतीचे प्रशिक्षण मच्छीमारांना देण्यात येत आहे.

मच्छीमारांना मासेमारीला पूरक व्यवसाय निर्माण व्हावा या हेतुने मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत समुद्र शेवाळ शेतीचा पर्याय समोर आणला जात आहे. शेवाळ बीज समुद्रात टाकले की ३० किंवा ४५ दिवसांमध्ये ती शेती तयार होते. हे उत्पादन विकत घेण्याकरिता उद्योजक, मोठ्या कंपन्यांना बोलावले जाते आणि हे उद्योजक हे शेवाळ विकत घेतात.

यातून मच्छीमारांना चांगला आर्थिक फायदा होतो. कोकणात आचरा, देवगड, दाभोळ अशा तीन ठिकाणी हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. आचरा खाडीत रविवारी (ता. ७) हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ आचराचे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते झाला. या वेळी गुजरात येथील सेंट्रल साल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट, भावनगरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम आदी उपस्थित होते.

या शेवाळाची लागवड तीन प्रकारे केली जाते. तमिळनाडू भागात पाणी शांत असल्याने बांबू तराफा पद्धतीने लागवड केली जाते. महाराष्ट्रात पाणी उथळ असल्याने येथे प्लोटीन मोनोलाइन पद्धतीने शेवाळ शेती केली जाते. आचऱ्यात याच पद्धतीने शेती केली जात आहे.

पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत दहा जागा शोधून शेवाळ शेती करायची आहे. शेवाळपासून केरीटीन आणि आगार अशी दोन केमिकल्स मिळतात. यांचा वापर खाद्य, सौंदर्य, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. हा प्रकल्प महाराष्ट्र फिशरी डिपार्टमेंटमार्फत राज्यात आलेला आहे.
मोनिका कवळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट, गुजरात

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT