Digital School Agrowon
ॲग्रो विशेष

Digital School : डहाणूतील शाळा झाल्या डिजिटल

E-Learning School : डहाणू ऊर्जा निर्मिती केंद्र, अदाणी पॉवर आणि अदाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने सोमवारी (ता. ११) तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक ई-लर्निंग साधनांचा उपक्रम राबवण्यात आला.

Team Agrowon

Kasa News : डहाणू ऊर्जा निर्मिती केंद्र, अदाणी पॉवर आणि अदाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने सोमवारी (ता. ११) तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक ई-लर्निंग साधनांचा उपक्रम राबवण्यात आला.

सीएसआर उपक्रमाअंतर्गत या शाळांना १० डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि सर्वसमावेशक ई-लर्निंग किट्स पुरवण्यात आले आहेत. या सुविधांचा लाभ पहिली ते दहावीच्या सुमारे १७०० विद्यार्थ्यांना झाला आहे.

ई-लर्निंग साधने आगवण (मोठापाडा), आगवण (शिशुपाडा), आगवण (नवासाखरा), आगवण (डोंगरीपाडा), आगवण (खारबाव), कैनाड (खरपडपाडा), कैनाड (कोटबीपाडा), रामपूर (खेडापाडा), पाले (लिंगापाडा) आणि पाले (बोरीपाडा) येथील शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि ई-लर्निंग किट्सच्या मदतीने विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून शैक्षणिक सामग्री सहज प्राप्त करू शकतात. त्यांना व्हिडिओद्वारे शिक्षण मिळण्याची संधी मिळत आहे. ज्यामुळे शिकण्याची पद्धती अधिक आकर्षक आणि संवादात्मक बनली आहे. ग्रामीण आणि शहरी शाळांमधील डिजिटल शिक्षणातील तफावत दूर करण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

नवी क्षितिजे खुली होणार

आमचा उद्देश विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण पद्धतींचा अनुभव देणे आहे. ई-लर्निंग किट्सच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी क्षितिजे खुली होतील. त्यांच्या शिक्षणात गुणवत्ता आणि आनंद दोन्ही वाढतील, असे अदाणी पॉवरच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT