Agriculture Department agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : कृषी खात्यात ५०० नाही ५ हजार कोटींचा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा संसदेत सवाल

Supriya Sule : महाराष्ट्रात कृषी खात्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केला. यावेली खासदार सुळे यांनी केंद्राकडे कारवाई करण्याची मागणी केली.

sandeep Shirguppe

Agriculture Department Maharashtra Scam : महाराष्ट्रात कृषी खात्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केला. यावेली खासदार सुळे यांनी केंद्राकडे कारवाई करण्याची मागणी केली. या आरोपांना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तातडीने दखल घेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करू असे कृषीमंत्री चौहान यांनी सांगितलं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी सुळे यांनी सवाल उपस्थित केले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातील आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्रातील कृषी विभागात ५०० कोटींचा घोटाळा झाला आहे असे सांगितले. हा ५०० कोटींचा घोटाळा नसून ५ हजार कोटींचा घोटाळा आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या आरोपावर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, "असा घोटाळा झाल्याची पहिल्यांदाच माझ्यासमोर माहिती आळी आहे. मला याची सत्यता पडतळावी लागेल". असे चौहान म्हणाले.

"मात्र, जर खरंच भ्रष्टाचार झाला असेल तर दोषींवर कठोर कारवाई करू असे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले. "सरकार अनियमितता सहन करणार नाही. तपासात जर कुणी भ्रष्टाचार केल्याचं आढळलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल" असेही चौहान म्हणाले.

"आतापर्यंत २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पंतप्रधान पीक विमा योजना लागू केलीय. तर उर्वरित राज्यांनी ही योजना स्वीकारलेली नाही. ही जगातली सर्वात मोठी पीक विमा योजना आहे. काही राज्य त्यांची स्वत:ची पीक विमा योजना चालवत आहेत. आम्ही त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचे फायदो सांगून योजना लागू करण्यास सांगितले आहे". असे चौहान म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांचाही आरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडमध्ये पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, पीक विमा योजनेंतर्गत १०५ कोटी रुपये बनावट खात्यांवर पाठवण्यात आले. तसंच डीबीटी योजना बंद केली गेली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या टीमने दीडशे ते दोनशे नावांवर निधी लाटला. मंत्रीही या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT