Founder, Isha Foundation,. Sadguru Jagdish Vasudev Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Producer Company : ‘माती वाचवा शेतकरी उत्पादक कंपनी’ची बनासकंठ येथे स्थापना

Banas Mati Save Farmers Production Company : सद्‌गुरू जगदीश वासुदेव यांच्या ‘माती वाचवा’ या मोहिमेतून प्रेरणा घेऊन अनोख्या अशा ‘बनास माती वाचवा शेतकरी उत्पादक कंपनी’ची येथे स्थापना करण्यात आली आहे.

Team Agrowon

Gujarat News : सद्‌गुरू जगदीश वासुदेव यांच्या ‘माती वाचवा’ या मोहिमेतून प्रेरणा घेऊन अनोख्या अशा ‘बनास माती वाचवा शेतकरी उत्पादक कंपनी’ची येथे स्थापना करण्यात आली आहे.

कंपनीच्या प्रयोगशाळांचे उद्‌घाटन गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ३) झाले. पहिल्या टप्प्यात ३००० शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

याप्रसंगी बोलताना श्री. चौधरी म्हणाले, ‘‘शेतकरी उत्पादक कंपनीच्या सेवा आपल्या शाश्‍वत भविष्याचा पाया रचतील. शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी आवश्यक असलेले ज्ञान, संसाधने आणि प्रगतीसाठी मदत होणार आहे. तसेच शेतीचा आधार असणाऱ्या मातीचीही निगा राखली जाईल.’’

‘माती वाचवा’ मोहिमेच्या मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीणा श्रीधर म्हणाल्या, ‘‘शेतकरी उत्पादक कंपनीमुळे होणाऱ्या बनासकंठ जिल्ह्यातील आव्हानात्मक मातीच्या अभ्यासाचा फायदा मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील निकृष्ट माती प्रदेशांना पुनरुज्जीवित करण्यासाठी होईल, या प्रयोगामुळे जागतिक मानक प्रस्थापित होऊ शकतात.’’

कंपनीचे उपक्रम

थरड येथे बनास मृदा चाचणी प्रयोगशाळा

खिमान येथे ‘बनास जैविक खत संशोधन आणि विकास प्रयोगशाळा’ आणि शेतकरी प्रशिक्षण हॉल

सूक्ष्मजीव-जंतूंचे जीवन आणि माती आरोग्यावरील ‘माती जीवन अहवाल’

मोफत माती परीक्षण, अनुदानित दर, ड्रोन सेवा, माती व्यवस्थापन प्रशिक्षण

शेतकरी उत्पादक कंपनी केवळ लोकांचे विकास करणार नाही, तर आपल्या जीवनाचा स्रोत असलेल्या मातीचे पोषण करून तिला समृद्ध करेल.
सद्‌गुरू जगदीश वासुदेव, संस्थापक, ईशा फाउंडेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; ओबीसी आरक्षणासह, नव्या प्रभागरचनेला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

Soybean Crop Damage : सततच्या पावसाने सोयाबीन पीक धोक्यात

Online Electricity Bill : सव्वातीन लाख ग्राहकांची वीजबिले ऑनलाइन

Humani Attack : हुमणी अत्यंत घातक कीड असल्याने एकात्मिक नियंत्रण करा

Bamboo Cultivation : सातारा जिल्ह्यात बांबूची ११०० हेक्‍टरवर लागवड

SCROLL FOR NEXT