Agriculture Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Exhibition 2024 : तुडये गावचे सतीश पाटील ठरले ड्रोनचे मानकरी

Agriculture Exhibition : ‘सकाळ- ॲग्रोवन विभागीय कृषी प्रदर्शना’त मुख्य आकर्षण असलेल्या ड्रोनचे भाग्यवान विजेते ठरले कोल्हापूर जिल्ह्यातील तुडये (ता. चंदगड) येथील प्रयोगशील शेतकरी सतीश पाटील.

Team Agrowon

Sangli News : ‘‘भाडे तत्त्वावर ड्रोन घेऊन रविवारी मी उसावर कीडनाशकाची फवारणी केली होती. आणि लगेचच सोमवारी मला सांगली येथील ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनातून चार वाजता फोन आला की तुम्ही भरलेल्या अॅग्रोवनच्या प्रवेशिकेद्वारे ड्रोनचे भाग्यवान विजेते ठरलेले आहात,’’ हे बोल आहेत तुडये (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील शेतकरी सतीश पाटील यांचे. ‘अॅग्रोवन’मुळेच मला स्वतःच्या मालकीचा ड्रोन मिळाला हे अतिशय आनंददायी आहे, असेही ते म्हणाले.

येथे सुरू असलेल्या ‘सकाळ- ॲग्रोवन विभागीय कृषी प्रदर्शना’त मुख्य आकर्षण असलेल्या ड्रोनचे भाग्यवान विजेते ठरले कोल्हापूर जिल्ह्यातील तुडये (ता. चंदगड) येथील प्रयोगशील शेतकरी सतीश पाटील. अत्यंत उत्कंठा पूर्ण वातावरणात प्रवेशिकेची सोडत काढण्यात आली. १८ ते २१ ऑक्टोबर या कृषी प्रदर्शनाच्या कालावधी दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनास भेट देऊन प्रवेशिका जमा केल्या होत्या. त्यातून सतीश पाटील हे विजेते ठरले.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या हस्ते व केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, जीईईनपीएस सोल्यूशन्स कंपनीच्या किसान ड्रोनचे वितरक सौरभ घेवारी, विक्रेते विक्रम पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लकी ड्रॉ काढण्यात आला. या वेळी कोल्हापूर ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव, सांगली ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी, कोल्हापूर ‘ॲग्रोवन’चे वरिष्ठ व्यवस्थापक शीतल मासाळ, सांगली ‘सकाळ’चे वितरण व्यवस्थापक रामकृष्ण लोकरे, नेचर केअर फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे आदींची या वेळी उपस्थिती होती.

सतीश विलास पाटील यांची तुडये येथे सात एकर जमीन आहे. यामध्ये अडीच एकरांमध्ये ऊस, तर अन्य क्षेत्रांमध्ये रताळी लागवड असते. बारावी शिकलेले सतीश पाटील हे वडिलोपार्जित शेती करतात. श्री. पाटील हे प्रयोगशील शेतकरी आहेत. मित्र परिवाराबरोबर शेती प्रदर्शन पाहणे हा त्यांचा छंद आहे. यातूनच त्यांनी मित्रांबरोबर दोन दिवसांपूर्वी सांगली येथील कृषी प्रदर्शनास भेट देऊन प्रवेशिका भरली होती. ते ‘ॲग्रोवन’चे पहिल्या दिवसापासूनचे वाचक आहेत. अत्याधुनिक तंत्राचा वापर करून शेती बदलाला त्यांनी सुरुवात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

Zilla Parishad Seizure Action: यवतमाळ जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की

Revenue Communication Initiative: ‘शेतकरी हक्क जागर, शेतकऱ्यांसाठी महसूल संवाद ’

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT