Kukadi Water Agrowon
ॲग्रो विशेष

Kukadi Water Project : कुकडी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा

Water storage In Kukadi Water Project : कुकडी प्रकल्पातील पाणलोटात समाधानकारक पाऊस पडला असल्याने प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Nagar News : कुकडी प्रकल्पातील पाणलोटात समाधानकारक पाऊस पडला असल्याने प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. प्रकल्पातील काही धरणे भरली आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत समाधानकारक वातावरण आहे. कुकडी लाभक्षेत्रातील पाण्याचा पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्यांना लाभ मिळतो.

कुकडी प्रकल्प हा पुणे जिल्ह्यात आहे. कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने मोठी विश्रांती घेतली. कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि लाभक्षेत्रात दोन्हीकडेही पाऊस नसल्याने शेतकरी चांगलाच चिंताग्रस्त झाला होता. मात्र गेल्या आठवड्यात कुकडीच्या लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. चांगल्या पावसामुळे कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट समाधानाचे वातावरण आहे. क्षेत्रात गेल्या आठवडाभरात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन तो ९० टक्के झाला आहे.

प्रकल्पातील डिंभे आणि वडज ही दोन धरणे तीन आठवड्यांपूर्वीच ओव्हर फ्लो झाली आहेत. घोड धरणात चांगला पाणीसाठा असून, वडज आणि डिंभे ही दोन धरणे तीन आठवड्यांपूर्वीच ओव्हर फ्लो झाली आहेत. दोन दिवस पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाल्यास टक्के कुकडी प्रकल्पातील उर्वरित धरणे ओव्हर फ्लो होण्याची अपेक्षा आहे. ही धरणे ओव्हर फ्लो झाल्यास पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

शेतकरी वर्गात समाधान

लाभक्षेत्रात देखील आता चांगला पाऊस होत असल्याने शेतकरी वर्गात समाधान पाहायला मिळत आहे. घोड, भीमा नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. दौंड पुलावर भीमा नदीत १५ हजार ४१८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. घोड धरणात ९५ टक्के, येडगाव धरणात ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT