Agriculture Department agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : सातारा ‘कृषी’ची कार्यालये ‘आयएसओ’ मानांकित

Agriculture Department Satara : कृषी विभागाच्या नऊ क्षेत्रीय कार्यालयांनी अभिलेख व्यवस्थापनासाठी आयएसओ ९००१:२०१५ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन मिळवले आहे.

Team Agrowon

Satara Agriculture Department : शासनाच्या १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कृषी विभागाच्या नऊ क्षेत्रीय कार्यालयांनी अभिलेख व्यवस्थापनासाठी आयएसओ ९००१:२०१५ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन मिळवले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे राज्यातील पहिले मानांकित कार्यालय ठरले आहे, तसेच त्‍याच्या अंतर्गत कार्यरत असणारी नऊ क्षेत्रीय कार्यालयेही आयएसओ २००१:२०१५ मानांकित झाली आहेत. या मानांकनामुळे कार्यालयीन प्रक्रियांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ आणि शासकीय सेवा पुरवठ्यात गुणवता सुनिश्चित होणार आहे.

आयएसओ ९००१:२०१५ हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन आहे. जे संस्थेच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे मूल्यांकन करते. या मानांकनामुळे संस्था त्यांच्या सेवा, प्रक्रिया आणि अभिलेख व्यवस्थापनात सातत्य, पारदर्शकता आणि ग्राहक समाधान सुनिश्‍चित करतात. कृषी विभागासाठी, हे मानांकन शेतकऱ्यांना अधिक प्रभावी सेवा देण्यासाठी आणि कार्यालयीन सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

या यशानंतर फरांदे यांनी सांगितले, की अंतर्गत सर्व कार्यालयांसाठीही याच पद्धतीने आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाची सेवा, गुणवत्ता अधिक वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक प्रभावी सेवा मिळतील.

मानांकन प्रक्रियेत केलेल्‍या सुधारणा

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली या मानांकनासाठी विविध सुधारणा केल्या गेल्या. यामध्ये क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयीन अभिलेखांचे विभागनिहाय वर्गीकरण, अभिलेख कक्षात सुव्यवस्थित मांडणी, कार्यालयाची साफसफाई आणि सुशोभीकरण, प्रत्येक शाखेची मानक कार्यप्रणाली तयार करणे आणि शासनाच्या सूचनांनुसार माहिती फलक लावण्‍याचा त्‍यात समावेश आहे.

मानांकनाचे फायदे

गुणवत्तापूर्ण सेवा : सेवा पुरवठ्यात सातत्य आणि गुणवत्ता सुनिश्चित होते.

कार्यक्षम अभिलेख व्यवस्थापन : अभिलेखांचे सुव्यवस्थित वर्गीकरण आणि साठवणूक.

पारदर्शकता : कार्यालयीन प्रक्रियांमध्ये पारदर्शकता वाढते.

या मानांकनामुळे सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाने एक नवीन मानक स्थापित केले आहे, जे इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT