Sangli District Bank Agrowon
ॲग्रो विशेष

District Bank : सांगली जिल्हा बॅंकेच्या कर्ज वसुलीसाठी पथक

Sangli District Bank Debt Recovery : सांगली जिल्हा बॅंकेचा एनपीए मार्चअखेरला कमी करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्हा बॅंकेचा एनपीए मार्चअखेरला कमी करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. १९ अधिकाऱ्यांचे पथक जिल्ह्यात तैनात केल्याची माहिती अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए पाच व नंतर शून्य टक्के करण्यासाठी अध्यक्ष मानसिंगराव नाईक, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी जाहीर केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ म्हणाले, की मार्चअखेरीस पावणेदोन महिने शिल्लक राहिले असल्याने थकित एनपीएची रक्कम कमी करण्याकरिता वसुलीसाठी जिल्ह्यात जोरदार मोहीम सुरू करण्यात येत आहे. त्यांचे नियोजन आतापासून केले जात आहे. रविवारी सुटीदिवशीही कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.

मार्च-२०२४ अखेर शनिवार, रविवारी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. एनपीए थकबाकीत निम्म्याहून अधिक रक्कम जत तालुक्यातील असून, मार्चअखेर यातील १५ कोटी रुपये कोणत्याही परिस्थितीत वसूल करण्यासाठी कार्यकारी अधिकारी वाघ यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका घेऊन वसुलीबाबत जोरदार मोहीमच उघडली आहे.

श्री. वाघ पुढे म्हणाले, ‘‘मार्चची नियमित वसुली होईलच, याची अडचण नाही. मात्र एनपीए थकबाकी वसुलीचे आव्हान आहे. एनपीएतील ५३ कोटींपैकी १८ कोटींची वसुली केली आहे. उर्वरित वसुलीसाठी नियोजन केले आहे. या थकबाकीमध्ये जत तालुक्याची रक्कम अधिक आहे. त्यामुळे जत तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, यासाठी १९ अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे.

मार्चअखेर ही वसुली होणे महत्त्वाचे आहे. जत तालुक्यातील वसुली झाली तर एनपीए कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठीच वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडली आहे. थकबाकीदारांनी वसुलीसाठी सहकार्य करावे, जिल्हा बँक शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांसह अन्य उद्योग-व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यासाठी जुनी थकबाकी वसूल होणे महत्त्वाचे आहे. कडक कारवाईची वेळ आणू न देता थकबाकी भरावी, असेही आवाहन वाघ यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT