Micro food processing industry  Agrowon
ॲग्रो विशेष

Micro food processing industry : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सांगली जिल्हा राज्यात अव्वल ; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार; ५३८ उद्योगांना मंजुरी

Food Processing : पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातील ५३८ लाभार्थींच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून, सध्या ही योजना राबवण्यात जिल्हा देशात द्वितीय व राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangali News : सांगली ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातील ५३८ लाभार्थींच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून, सध्या ही योजना राबवण्यात जिल्हा देशात द्वितीय व राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार म्हणाले, ‘‘पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना २०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षांसाठी केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे लागू केली आहे. या योजनेमध्ये सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांचा विस्तार करणे, नवीन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे व असंघटित उद्योगांना संघटित स्वरूप देणे, या क्षेत्राच्या प्रकल्पांच्या औपचारिकीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे.

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये २०२०-२१ पासून १२६७ प्रकल्प मंजूर असून लाभार्थींना ३६.३७ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी २०२४-२५ या वर्षी ५३८ लाभार्थींच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून १२.६७ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने बेदाणा प्रक्रिया, अन्नधान्य प्रक्रिया, मसाला उद्योग, बेकरी पदार्थ, पशुखाद्य निर्मिती प्रक्रिया आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेद्वारे ३४६५ कुशल, अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाला आहे.’’

कुंभार म्हणाले, ‘‘सद्यःस्थितीमध्ये जिल्ह्यातून आजअखेर १२६७ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून प्रकल्प मंजूर करण्याच्या बाबतीत सांगली जिल्हा देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापैकी २०२४-२५ यावर्षी जिल्ह्यास ४७८ लक्ष्यांक असून ५३८ साध्य असून सांगली जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. सांगली जिल्ह्यात १२७२ वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहायता गट लाभार्थींना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT