Micro Food Industry : नांदेडला २४७ सूक्ष्म खाद्य उद्योगांना २० कोटींची मंजुरी

Agriculture Department : नांदेड जिल्ह्यात २४७ उद्योगांना २० कोटी ४७ लाख ७ हजार ४९५ रुपयांची मंजुरी मिळाली. तर १५ कोटी ९ लाख २२ हजार ७६५ रुपये त्यांना प्राप्त झाले आहेत.
Micro Food Industry
Micro Food IndustryAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात २४७ उद्योगांना २० कोटी ४७ लाख ७ हजार ४९५ रुपयांची मंजुरी मिळाली. तर १५ कोटी ९ लाख २२ हजार ७६५ रुपये त्यांना प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांना सहा कोटी १४ लाख ३३ हजार ८७७ रुपयांचे अनुदान कृषी विभागामार्फत वितरित करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.

आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजना २०२४-२५ अंतर्गत जिल्ह्यास वैयक्तिक घटकांचे ४१५ लक्ष्यांक प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योजक उभारणीसाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के तसेच जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

Micro Food Industry
Food Processing Industry : अन्न प्रक्रिया अनुदानासाठी कागदपत्रे जोडण्याची सुविधा

नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्यःस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तरवृद्धीसाठी या योजनेतून संबंधित जिल्ह्याच्या एक जिल्हा एक उत्पादन यावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जात आहे.

Micro Food Industry
Food Processing Micro Industry Loan : अन्न प्रक्रिया सूक्ष्म उद्योगांसाठी ९ कोटी ९३ लाखांवर कर्ज वाटप

या योजनेअंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बीज भांडवल, मार्केटिंग व ब्रॅन्डिंग इत्यादी घटकांकरिता अर्थ सहाय्य देण्यात येते. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त १० लाख तर सामाईक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन केंद्र, मूल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त तीन कोटी अर्थसाहाय्य देय आहे.

यासाठी उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था, तसेच गट लाभार्थींमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी-शासकीय संस्था यांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण करण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनी केले.

‘आत्मा’तील नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प करतेवेळी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेसोबत कृषी पायाभूत योजनेची सांगड घातल्यास अनुदानाबरोबर व्याजात तीन टक्के सवलत मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com