Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात ९१ टक्के रब्बीचा पेरा

Rabi Season : सांगली जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी आटोपली असून एक लाख ७४ हजार २७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी आटोपली असून एक लाख ७४ हजार २७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात गळीत धान्य पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार १६३ हेक्टर आहे. त्यापैकी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ लाख २५ हजार ६६ हेक्टर असून १ लाख १८ हजार ५२२ हेक्टरवर म्हणजे ९४ टक्के पेरणी झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली आहे. जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात ज्वारी पीक पोटरी अवस्थेत आहे. तर इतर भागात पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून हरभरा आणि गव्हाच्या पेरणीला गती आली आहे. गव्हाची पेरणी १६ हजार ६२६ हेक्टरवर तर हरभरा पिकाची १९ हजार ७४२ हेक्टरवर पेरा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढल्याने गहू आणि हरभरा पिकास पोषक वातावरण आहे. त्यामुळे हरभरा आणि गव्हाची वाढ चांगली होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.

जिल्ह्यात गळीत धान्यामध्ये सूर्यफूल आणि करडई या दोन पिकांची प्रामुख्याने पेरणी होते. जिल्ह्याचे सूर्यफुलाचे सरासरी क्षेत्र ४७४ हेक्टर आहे. मात्र यंदाच्या हंगामात सूर्यफुलाची १३ हेक्टर म्हणजे २.८ टक्के पेरणी झाली आहे.

करडईचे सरासरी क्षेत्र ३६५ हेक्टर असून एक हेक्टर वर पेरणी झाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यातील गळीत धान्य पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. त्यामुळे गळीत धान्याच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र आहे.

तूर काढणीचे नियोजन सुरू

जिल्ह्यात खरीप हंगामात १० हजार ९७६ हेक्टर पेरणी झाली होती. सर्वाधिक तूर पिकाची लागवड जत तालुक्यात होते. इतर भागात कमी अधिक क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी केली जाते. इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी तूर पीक काढणीचे नियोजन सुरू केले आहे. जत तालुक्यात ८५ टक्के तुरीची काढणी झाली आहे.

तालुकानिहाय रब्बी पेरणी क्षेत्र दृष्टिक्षेप(हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज २३,३५२

जत ७६,१२०

खानापूर ६,२००

वाळवा ८,०२८

तासगाव १०,३२२

शिराळा ४,६७५

आटपाडी १५,६८२

कवठेमहांकाळ १८,४५१

पलूस ३,०९०

कडेगाव ८,३५७

एकूण १ लाख ७४,२७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT