Sangli DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बॅंकेकडून १० हजार कोटी ठेवींचा संकल्प

Co-Operative Bank : जिल्हा बॅंकेच्या शतकमहोत्सवी वर्षात १० हजार कोटी ठेवी आणि नऊ हजार कोटी कर्जे वितरणाचा संकल्प बॅंक अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी जाहीर केला.

Team Agrowon

Sangli News : जिल्हा बॅंकेच्या शतकमहोत्सवी वर्षात १० हजार कोटी ठेवी आणि नऊ हजार कोटी कर्जे वितरणाचा संकल्प बॅंक अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी जाहीर केला. १ एप्रिलपासून शेळ्या-मेंढ्या, गाय-म्हैस पालनासाठी ३ लाख रुपये भांडवल शून्य टक्क्यांनी तसेच सर्व महामंडळाच्या लाभार्थींना कर्जे दिली जातील, असेही ते म्हणाले.

यावेळी संचालक दिलीप पाटील, संग्रामसिंह देशमुख, सीईओ शिवाजीराव वाघ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एक वर्षाने म्हणजे २८ मार्च २०२६ रोजी बॅंकेचे शतकमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. बॅंकेच्या वाटचालीबाबत अध्यक्ष नाईक म्हणाले,‘ सांगली संस्थानचे संस्थानिक चिंतामण पटवर्धन यांनी बॅंकेची स्थापना केवळ ५ हजार भागभांडवलावर केली होती.

बॅंक ९८ वर्षे पूर्ण करून ९९ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. अनेक वादळे आली तरी, सद्य:स्थितीत बँकेची आर्थिक स्थिती सध्या भक्कम आहे. भागभांडवल १९० कोटी, ठेवी ८ हजार २७५ कोटी, कर्जे ७२०० कोटी, तर एकूण व्यवसाय १५ हजार ५०० कोटींचा आहे. ३१ मार्चला निव्वळ एनपीए शून्य टक्के, तर ग्रॉस एनपीए ७.५ टक्क्यांवर असेल. बॅंकेच्या वाढीव दहा शाखांसह २२८ शाखांचा विस्तार आहे.

आजवरच्या वाटचालीत संस्थापक चिंतामणराव पटवर्धन, भगवानराव दप्तरदार, रामभाऊ आरवडे, गुलाबराव पाटील, बाजीराव बाळाजी पाटील, विलासराव शिंदे, अनिल बाबर यांच्यासह सहकारातील ज्येष्ठ नेते वसंतरावदादा पाटील, राजारामबापू पाटील, विष्णूअण्णा पाटील, पतंगराव कदम, आर. आर. आबा पाटील यांचे योगदान आहे.

आजवर एकाही अध्यक्षांनी पक्षीय कोट घालून बॅंकेचा कारभार केलेला नाही. शेतकऱ्यांसह शेतीपूरक व्यवसायवृध्दीसाठी बँकेचे उद्दिष्ट आहे आणि यापुढेही राहील. सध्याही जयंतराव पाटील, विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय संचालक काम करताहेत. जिल्ह्याचे खासदार, सर्व आमदार यांच्यासह आजवरचे ३७ अध्यक्ष, एक प्रशासक यांची वाटचालीत महत्त्वाची भूमिका आहे.

...असे असेल शतकमहोत्सवी वर्ष

अध्यक्ष नाईक म्हणाले,‘बॅंकेच्या शतकमहोत्सवी वर्षात ग्रॉस एनपीए ४ टक्क्यांवर असेल. वर्षभरात देश, राज्यपातळीवरील सहकार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कृषी पदवीधर, महिला बचत, एआय तसेच युवकांच्या मदतीसाठी धोरण घेतले जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

SCROLL FOR NEXT