Agriculture Input  Agrowon
ॲग्रो विशेष

MPDA Act : कृषी निविष्ठा विक्री ठप्प

Agriculture Inputs : पुणे जिल्हा ॲग्रिकल्चर डीलर असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोरे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालक गेली अनेक वर्षे प्रामाणिक व्यवसाय करत आहोत.

गणेश कोरे

Pune News : वाळू तस्कर व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठीच्या महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्यात कृषी सेवा केंद्रांचा समावेश केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कृषी सेवा केंद्रचालकांनी गुरुवार (ता. २)पासून शनिवार (ता.४)पर्यंत निविष्ठा विक्री बंदचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे निविष्ठा विक्री ठप्प झाली आहे. याचा परिणाम रब्बी पिकांच्या पेरण्यांसह फलोत्पादनाच्या पिकांवर होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा ॲग्रिकल्चर डीलर असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोरे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालक गेली अनेक वर्षे प्रामाणिक व्यवसाय करत आहोत. मात्र अचानक राज्य सरकारने आणि कृषिमंत्र्यांनी आमचा व्यवसाय ‘एमपीडीए’ कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा निर्णय घेतला.

कायद्यातील ४० ते ४४ तरतुदी या जाचक आणि अन्यायकारक आहेत. केंद्र सरकारचे कायदे असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. खते, बियाणे आणि कीटकनाशकांमधील भेसळीसाठी तालुकास्तरीय समिती कार्यरत आहे.

तक्रारींसाठी ही समिती पंचनामे, प्रयोगशांमधील चाचण्यांच्या आधारे निर्णय देते. मात्र नव्याने येणाऱ्या कायद्यामुळे भ्रष्टाचार वाढेल. इतर विभागांचा त्रास वाढेल. याबाबत ‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तरळ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आयुक्त, सचिव आणि कृषिमंत्र्यांना देखील निवेदन दिले आहे. त्यानुसार या कायद्यात आमचा समावेश करू नये, अशी मागणी केली आहे.

‘एमपीडीए’ कायद्याची अंमलबजावणी झाल्यास अनेक कृषी सेवा केंद्रे बंद करण्याची वेळ येईल. कायद्यातील जाचक अटींमुळे पुढील पिढी या व्यवसायात येणार नाही. अनेक कृषी निविष्ठांचे व्यवसाय इतर राज्यांत जाण्याचा धोका निर्माण होईल.
- महेश मोरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा ॲग्रिकल्चर डीलर असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Railway : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे धावणार

Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

Makan-Kirana Scheme : ग्रामीण महिलांना घरकुलाबरोबर किराणा दुकानासाठी थेट मदत

Rover Machine Shortage : रोवर युनिटची संख्या वाढेना

Agrowon Podcast: सोयाबीनवरील दबाव कायम; मोहरीला चांगला उठाव, लाल मिरची टिकून, वांग्याला मागणी कायम तर गव्हाचे भाव स्थिर

SCROLL FOR NEXT