Cotton Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seeds Sale : हिंगोलीत खरिपाच्या ३३ हजार क्विंटलवर बियाण्याची विक्री

Kharif Season : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात शुक्रवार (ता. १४)पर्यंत विविध पिकांचे मिळून ३३ हजार ६३३ क्विंटल बियाणे व कपाशी बियाण्याच्या ८५ हजार ५७२ पाकिटांची विक्री झाली आहे.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात शुक्रवार (ता. १४)पर्यंत विविध पिकांचे मिळून ३३ हजार ६३३ क्विंटल बियाणे व कपाशी बियाण्याच्या ८५ हजार ५७२ पाकिटांची विक्री झाली आहे, अशी मागणी कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदाच्या खरिपातील प्रस्तावित ३ लाख ११ हजार ४०४ हेक्टर क्षेत्रानुसार खासगी, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडे विविध पिकांच्या ७१ हजार ५७ क्विंटल बियाणे तसेच कपाशी बियाण्याच्या १ लाख ६४ हजार ३४ पाकिटांची मागणी करण्यात आली होती.

त्यात सार्वजनिक बियाणे उत्पादकांकडे १० हजार ८२९ क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडे ६० हजार २२७ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. शुक्रवार (ता.१४)पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांनी ३ हजार ७६५ क्विंटल आणि खासगी कंपन्यांनी ६२ हजार ९५५ क्विंटल मिळून एकूण ६६ हजार ७२० क्विंटल बियाण्याचा पुरवठा केला आहे.

त्यात ज्वारीचे ४६ क्विंटल, बाजरीचे ३० किलो, तुरीचे १ हजार ४४५ क्विंटल, मुगाचे १२५ क्विंटल, उडदाचे ९२ क्विंटल, मक्याचे ११ क्विंटल, सोयाबीनचे ६४ हजार ९९९ क्विंटल बियाणे, तसेच कपाशी बियाण्याची १ लाख २५ हजार १९६ पाकिटांचा समावेश आहे.

शुक्रवार (ता. १४)पर्यंत एकूण ३३ हजार ६३३ क्विंटल बियाण्याची तसेच कपाशी बियाण्याच्या ८५ हजारांवर पाकिटांची विक्री झाली. त्यात ज्वारीचे ७.५७ क्विंटल तुरीचे ६०१ क्विंटल, मुगाचे ५६.९० क्विंटल, उडदाचे ५१.४० क्विंटल, सोयाबीनचे ३२ हजार ९१६ क्विंटल बियाणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT