Cotton Seeds
Cotton Seeds Agrowon

Cotton Seed Sale : कापूस बियाणे विक्रीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

Cotton Seed Update : बियाण्याचा पुरवठा काही कंपन्यांकडून कमी झाला. पण यंदा बियाणे खरेदीला मे पासून प्रतिसाद मिळाला. सुमारे २० लाख पाकिटांची विक्री खानदेशात झाल्याचा अंदाज आहे.
Published on

Jalgaon News : खानदेशात कापूस बियाणे विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बियाण्याचा पुरवठा काही कंपन्यांकडून कमी झाला. पण यंदा बियाणे खरेदीला मे पासून प्रतिसाद मिळाला. सुमारे २० लाख पाकिटांची विक्री खानदेशात झाल्याचा अंदाज आहे.

जळगावात एकूण २६ ते २७ लाख पाकिटांची विक्री या महिन्याच्या अखेरपर्यंत अपेक्षित आहे. अर्थात तर धुळे व नंदुरबारात मिळून १७ लाख कापूस बियाणे पाकिटांची विक्री अपेक्षित आहे. यंदा अवैध कापूस बियाण्याचीदेखील विक्री वाढली, यामुळे कापसाच्या सरळ वाणांचा पुरवठा मात्र कमी आहे. या बियाण्यासाठी शेतकरी वणवण फिरत आहेत. त्याचा पुरवठा खानदेशात या महिन्यात झाला. यामुळे अनेक बागायतदार कापूस उत्पादकांना सरळ वाणांची लागवड करणे शक्य झालेले नाही. काहींनी मागील दोन दिवसात काळ्या बाजारातून सरळ वाण घेऊन त्याची लागवड केली.

Cotton Seeds
Cotton Seeds : अकोला जिल्ह्यात कपाशी बियाण्याचा काळाबाजार

सरळ वाणांची मागणी खानदेशात सुमारे दोन ते अडीच लाख पाकिटांची आहे. पण पुरवठा सुमारे पाच हजार पाकिटेदेखील झालेला नसल्याची माहिती आहे. केळी उत्पादक पट्ट्यात या सरळ वाणांची मागणी अधिक असते. त्याच्या पुरवठ्याबाबत प्रशासन किंवा कृषी यंत्रणा गंभीर नाहीत. त्याचा काळाबाजारही तुटवड्यामुळे काही भागात सुरू झाल्याची माहिती आहे.

Cotton Seeds
Cotton Seeds : कपाशीच्या विशिष्ट वाणांच्या बियाण्यांची जादा दराने विक्री

पाचोरा, जामनेर, रावेर, धुळ्यातील शिरपूर या भागात जादा दरात सरळ वाणांची मागणी यंदाही आहे. काही शेतकऱ्यांनी १ जूनपूर्वीच कापूस लागवड केली. त्यासाठी बियाणे १५ मे पासून खरेदी करण्यास सुरुवात झाली. खानदेशात १५ मे ते ३१ मे यादरम्यान सुमारे सव्वा लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात पाच लाख ५४ हजार हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित आहे. जिल्ह्यात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख ९८ हजार हेक्टर एवढे आहे. यंदा लागवड कमी होणार आहे. धुळ्यात सव्वादोन लाख व नंदुरबारात सव्वालाख हेक्टरवर कापूस पीक असणार आहे.

जळगावात सव्वा लाख हेक्टरवर पूर्वहंगामी

खानदेशात पूर्वहंगामी कापूस पीकही सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवर आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. पण अवैध बियाणे विक्रीमुळे शेतकऱ्यांची यंदाही नाडवणूक सुरू आहे. कापूस लागवड सुरू राहणार असून, त्यासाठी बियाण्याची मागणीदेखील कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com