Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Mill Election : ‘सहकारशिरोमणी’, ‘मकाई’साठी निवडणुकीची रणधुमाळी रंगणार

Sugar Factory Election : गेल्या काही महिन्यांपासून या कारखान्याच्या निवडणुकांची चर्चा सुरू होती. पंढरपुरातील सहकारशिरोमणी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांची सत्ता आहे.

Team Agrowon

Solapur Sugar mill Election : सोलापूर जिल्ह्यातील भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सहकारशिरोमणी आणि भिलारवाडी (ता. करमाळा) येथील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या १८ मेपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येतील. पुढील महिन्यात १६ जून रोजी मतदान आणि १८ जूनला मतमोजणी होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या कारखान्याच्या निवडणुकांची चर्चा सुरू होती. पंढरपुरातील सहकारशिरोमणी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांची सत्ता आहे. ते स्वतः कारखान्याचे चेअरमन आहेत. तर करमाळ्यातील मकाई कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे.

तिथे माजी मंत्री दिगंबर बागल यांचे चिरंजीव दिग्विजय बागल चेअरमन आहेत. पूर्वीपासून हे दोन्ही कारखाने अनुक्रमे काळे आणि बागल यांच्या गटाकडेच आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून काळे आणि बागल विरोधकांनी चांगली मोट बांधल्याचे दिसते.

कारण सातत्याने ऊसदर आणि अन्य मुद्द्यांवरून त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झडत आले आहेत. त्यामुळे काळे आणि बागल यांना ही निवडणूक सहजासहजी घेता येणार नाही. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका रंगतदार होणार, हे निश्‍चित आहे.

सहकारशिरोमणी साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याकडे, तर पुनर्वसन शाखेचे उपजिल्हाधिकारी सोपान टोपे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सहकारशिरोमणी कारखान्याच्या २१ जागांसाठी तर मकाई साखर कारखान्याच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सहकारशिरोमणी कारखान्यासाठी पंढरपुरात प्रातांधिकारी कार्यालयात, तर मकाई कारखान्यासाठी करमाळ्याच्या तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT