Crop insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop insurance : पीक विम्यामध्ये घोटाळा झाल्याचा सदाभाऊंचा आरोप; सत्तारांना लगवला टोला

विमा कंपनीकडून अजूनही नुकसान भरपाई राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

Team Agrowon

राज्यात पीक विमा घोटळा झाला असून सरकारने या घोटाळ्यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी बुधवारी (ता.१५) रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.

पीक विम्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना टोलाही लगवला. 

"पीक विमा कंपनीची कार्यालय कुठं आहेत? कंपनीची माणसं कुठं आहेत? ते कळत नाही. पीक विमा म्हणजे मुका, अंधाळा आणि बहिरा असा कार्यक्रम आहे." असेही म्हणत सदाभाऊंनी सरकारवर टीका केली.

सदाभाऊ खोत यांनी यावेळी राज्याचे कृषिमंत्री सत्तार यांच्यावरही निशाणा साधला.

कृषिमंत्र्यांच्या कारभारावराही प्रश्न चिन्ह उपस्थित करत खोत म्हणाले ,"राज्याचे कृषिमंत्री सध्या राज्यात आहेत का नाहीत, असा प्रश्नही मला पडला आहे.

आता त्यांनी राज्यातील विमा आणि कृषी प्रश्नावर लक्ष द्यायला पाहिजे." 

सदाभाऊ यांनी पीक विम्याच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे.

दरम्यान, ऑक्टोबरमध्ये पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

परंतु विमा कंपनीकडून अजूनही नुकसान भरपाई राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

SCROLL FOR NEXT