Payment Delay: वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जानेवारी महिन्यापासूनचे ‘केन पेमेंट’ अद्याप मिळालेले नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, शेतकरी नेते चितांगराव कदम हे शनिवारपासून (ता. ४) शेतकऱ्यांसह कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत..वसंत सहकारी साखर कारखाना सध्या भैरवनाथ शुगर फॅक्टरीने भाडे तत्त्वावर चालवायला घेतला आहे. मात्र, १ जानेवारीपासून आजतागायत गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. नियमानुसार ऊस कारखान्याला घातल्यानंतर १४ दिवसांच्या आत पेमेंट मिळणे बंधनकारक असताना, अनेक महिने उलटूनही मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. .Sugarcane Payment Issue: शेतकऱ्यांचा ऊस बिलप्रश्नी कारखानदारांना इशारा.शिवसेना नेते चितांगराव कदम यांनी चार दिवसांपूर्वी ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात केले पेमेंट जमा करावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा कारखाना प्रशासनाला दिला होता तरी देखील कारखाना प्रशासनाने उसाचे थकीत पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात जमा न केल्याने त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल.या उपोषणाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला आहे. अन्यथा पुन्हा आंदोलन श्री. कदम म्हणाले, की शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे..शासनाच्या नियमांची पायमल्ली करत कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवले आहेत. जोपर्यंत थकीत पेमेंट मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही.’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.