Sadabhau Khot agrowon
ॲग्रो विशेष

Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांची जीभ पुन्हा घसरली, संजय राऊतांवर खालच्या पातळीत टीका

Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती.

sandeep Shirguppe

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. आता सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत थेट डुक्कराची उपमा दिली आहे.

खोत म्हणाले की, 'संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहे. डुकराला कितीही साबण लावला तरी ते घाणीत जात असतं. संजय राऊत यांनी आम्हाला कुत्र्याची उपमा दिली पण कुत्रे हे इमानदार असतात ते धन्याची राखण आणि संरक्षण करतात.', असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

आमदार खोत पुढे म्हणाले की, 'संजय राऊतला गावगाडा माहिती नाही. त्यामुळे राखण करणारा कुत्रा म्हणजे काही माहित नाही. पण तुम्ही २०१४ ला नरेंद्र मोदी यांचा फोटो गळ्यात अडकवून मताचा जोगवा मागत गावोगावी फिरत होता. २०१९ लाही भाषण करत होता सत्तेत आल्यावर तुम्ही पहिला खंजीर हातात घेतला.

तुमच्यात इमानदारपणा आहे का शोधा आणि कुत्र्याएवढा जरी इमानदारपणा असता तर महाराष्ट्राने तुमचं कौतुक केलं असतं. तरीही मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही. कारण डुकराला कितीही साबण- शॅम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जातं.', अशी टीका सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर केली आहे.

अजित पवारांचे सदाभाऊंना खडे बोल

शरद पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत दिला.

ज्येष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब यांच्याविषयी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे असे सांगतानाच अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवारसाहेबांवर वैयक्तिक टीका करणे पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने व वैयक्तिकरित्या या विधानाचा अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT