Mushroom Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mushroom Cultivation : ग्रामीण युवकांनी अळिंबी लागवडीकडे वळावे

Training Center for Agricultural Sciences : भा.कृ.अनु.प.-अटारी, पुणे आणि ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अळिंबी लागवड तंत्रज्ञान’वर विशेष पाचदिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे कौशल्य विकास योजना अंतर्गत आयोजित केले होते.

Team Agrowon

Narayangaon News : भा.कृ.अनु.प.-अटारी, पुणे आणि ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अळिंबी लागवड तंत्रज्ञान’वर विशेष पाचदिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे कौशल्य विकास योजना अंतर्गत आयोजित केले होते.

या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, कृषी विस्तार शास्त्रज्ञ राहुल घाडगे, आखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्प, पुणेचे माजी कवकशास्त्रज्ञ डॉ. ए. पी. गायकवाड, राजुरी येथील निर्वाणा फ्रेशचे अमर पडवळ, आत्माचे धोंडिभाऊ पाबळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. दत्तात्रय गावडे म्हणाले, की शेतकऱ्यांना अळिंबी उत्पादनासाठी प्रशिक्षित करून अळिंबी लागवड आणि उत्पादन करून दुसऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व प्रचार करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. डॉ. ए. पी. गायकवाड यांनी अळिंबीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी शेतीला पूरक म्हणून अळिंबी उत्पादनाकडे पाहावे. धिंगरी अळिंबी लागवडीतून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शेतातील पिकांमधील काडी-कचरा, पालापाचोळा व पीक अवशेष वापरून धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येते. असे डॉ. गायकवाड म्हणाले.

डॉ. गावडे म्हणाले, की अळिंबीचे उत्पादन हे बंदिस्त जागेमध्ये घेता येत असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून कोणताही धोका पोहोचत नाही. तसेच कमी उत्पादन खर्चात अळिंबीमधून चांगला नफा मिळू शकतो. अळिंबीमध्ये पोषणमूल्ये अधिक असल्यामुळे त्याचा आहारामध्ये आंतर्भाव केल्यास आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

या वेळी धिंगरी अळिंबी लागवड व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

कृषी विस्तार शास्त्रज्ञ राहुल घाडगे म्हणाले, की आमच्या केंद्रामार्फत अळिंबी उत्पादकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जाईल. तसेच अळिंबी विपणन व मार्केटिंग यावर अळिंबी उत्पादकांना सहकार्य केले जाईल. कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ निवेदिता शेटे यांनी अळिंबीपासून उप-पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक करून दाखविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT