Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : आत्मनिर्भर देशनिर्मितीसाठी गावखेड्यांचा विकास आवश्‍यक

PDKV Akola : आत्मनिर्भर देशनिर्मितीसाठी गावखेड्यांचा सर्वांगीण विकास आवश्‍यक आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Akola News : आत्मनिर्भर देशनिर्मितीसाठी गावखेड्यांचा सर्वांगीण विकास आवश्‍यक आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.

कृषी विद्यापीठात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात कुलगुरू डॉ. गडाख बोलत होते. देश सर्वार्थाने विकसित होण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी गावखेड्यांचा शाश्वत विकास ही प्राथमिकता असून कृषी-अकृषी विद्यापीठांसह सर्व शासकीय-निमशासकीय विभाग, सहकारी-सेवाभावी-खासगी संस्थांनी एकत्र येत गावांच्या गरजा लक्षात घेऊन सामूहिक पद्धतीने नियोजन केल्यास गाव आणि पर्यायाने राष्ट्र अधिक प्रगत होईल, असेही ते म्हणाले.

उन्नत भारत अभियानाअंतर्गत ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना विदर्भातील ग्रामस्थांनी स्वीकारली असून या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीतून गावांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठाच्या प्रयत्नांना प्रतिसाद लाभत असल्याचेही कुलगुरू म्हणाले.

आपल्या दैनंदिन कार्याबरोबरच विद्यापीठ तथा शेती विकासासाठी विशेष योगदान देणाऱ्या, आपल्या विभागाचा सर्वांगीण विकास करण्याऱ्या, कृषी निविष्ठा विक्री तथा बाह्य स्रोतांकडून आर्थिक पाठबळ उभारणाऱ्या अधिकारी, कर्मचारी वर्गाचा अतिशय सन्मानाने उल्लेख त्यांनी केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरू डॉ. गडाख, कुलसचिव सुधीर राठोड, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, अधिष्टाता डॉ. श्यामसुंदर माने, डॉ. देवानंद पंचभाई, डॉ. सुरेंद्र काळबांडे, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी यांनी पंजाबराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला आदरांजली अर्पण केली. कुलगुरू डॉ. गडाख यांनी ध्वजवंदन केले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT