Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance: काही सुधारणा करून एक रुपयातच पीकविमा; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्‍वासन

Agriculture Minister Manikrao Kokate: ‘एक रुपयात पीकविमा’ योजना बंद होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात असताना गुरुवारी (ता. १३) नागपूर दौऱ्यावर असताना कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी तशी शक्‍यता फेटाळून लावत याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.

Team Agrowon

Nagpur News: ‘एक रुपयात पीकविमा’ योजना बंद होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात असताना गुरुवारी (ता. १३) नागपूर दौऱ्यावर असताना कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी तशी शक्‍यता फेटाळून लावत याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. मात्र, या योजनेत शेतकरीपूरक बदलावर भर राहील, असेही त्यांनी सांगितले.

नागपूर दौऱ्यावर असलेल्या कृषिमंत्र्यांनी गुरुवारी (ता.१३) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एक रुपयांतील पीकविमा योजना यापुढे देखील राहील, असे स्पष्ट केले. मात्र राज्यात काही ठिकाणी पडीक जमीन त्यासोबतच बोगस लाभार्थ्यांच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न झाला. कृषी आयुक्‍तालयस्तरावरून केलेल्या पडताळणीअंती ही बाब उघडकीस आली. रॅन्डम पद्धतीने सर्व्हेक्षण करून अशा बोगस प्रकारांवर चाप लावला गेला.

त्यामुळे अशा बोगस लाभार्थ्यांना पैसे दिलेले नाहीत, देण्याचा प्रश्‍न देखील नाही. काही मुद्दे या संदर्भाने असतील तर त्यावर कृषी विभागाच्या स्तरावर चौकशीअंती कारवाई केली जात आहे. गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी यापुढे देखील काही सुधारणा प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई व्हावी या उद्देशाने ही योजना राबविली जात आहे.

त्यामुळे यापुढील काळात देखील ‘एक रुपयातच पीकविमा’ योजना राबविली जाणार असून अंमलबजावणी करताना केवळ काही तांत्रिक सुधारणा केल्या जातील, अशी स्पष्टोक्‍ती मंत्री श्री. कोकाटे यांनी दिली. पीकविमा योजनेत सुधारणा करताना शेतकऱ्यांच्या सूचनांचा देखील विचार करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना यापुढील काळात अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर राहील, असा दावाही त्यांनी केला.

सरकारी योजनांमध्ये बदल करावयाचा असल्याने त्याविषयी शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याकरिता राज्यातील सर्वच विभागांत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. यापुढील टप्प्यात जिल्हा, तालुका आणि त्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात त्यांच्या अडचणी आणि तंत्रज्ञान समजावून घेण्यावर भर राहील, असेही त्यांनी सांगितले.

सोयाबीन-कापूस खरेदी पणनचा विषय

आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कमी दरात विकावा लागत आहे. त्यातच बिलिंग सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी देखील बंद आहे. याविषयी विचारणा केली असता हा मुद्दा पणन मंत्रालयाच्या अखत्यारितील असल्याने त्यावर भाष्य करणे सयुक्तिक होणार नाही, असे श्री. कोकाटे यांनी सांगितले.

कृषी साहित्य खरेदीवर बोलणे टाळले

डीबीटीऐवजी थेट कृषी साहित्य खरेदी व त्यातून झालेला गैरव्यवहार याविषयी पत्रकारांनी कृषिमंत्र्यांना विचारणा केली. मात्र याविषयी अजून माहिती घेतली नसल्याने माहिती घेऊन मी बोलेल, असे सांगून कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी वेळ मारून नेली. त्यासोबचत आमदार छगन भुजबळ यांच्याविषयीच्या प्रश्‍नाला देखील त्यांनी बगल दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

Poultry Processing By Products: कुक्कुट प्रक्रिया उद्योगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धन

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

SCROLL FOR NEXT